Truelove ,unconditional love खरे प्रेम कुठे मिळेल ?


खरे प्रेम कुठे मिळेल ? 

Truelove



     एक दिवस एक भारतीय  संत साधु सुंदर सिंग हे जंगलातून जात असताना अचानक त्यांची नजर जंगलातील एका ठिकाणी जळत असलेल्या भागाकडे गेली. त्याने पाहिले कि, एक पक्षी पेटलेल्या फांदीवर फडफडत आहे. क्षणात तो पक्षी आपल्या घरट्यासह सुन्दर सिंग जवळ येऊन पडला. आग विझल्यानंतर त्यांनी ते जवळ जाऊन पाहिले तर पक्षी घरट्यात जळून मरून पडलेला त्यास आढळला. त्यांनी त्यास उचलले तर त्याच्याखाली त्यांना तीन लहान जिवंत पिल्ले आढळली, ते पहाताच सुंदर सिंग उद्गारले, “ओ.. किती हे प्रेम” !, त्या पिलाना वाचवण्यासाठी त्यांच्या आईला मरावे लागले
 



  प्रेमाचे फक्त हे एक उदाहरण आहे, जे या भूतलावर पक्ष्यामध्ये, पशुमध्ये, मानवामध्ये पहाण्यास मिळते. थोडक्यात सांगायचे तर परमेश्वराच्या सर्व सजीव निर्मितीत आपणास प्रेम अनुभवण्यास मिळते. प्रेम आणि मैत्री हे सर्व नात्यासंबधात एक मधुर अस नात आहे. “प्रेम हे एक जीवनाची एक प्रेरकशक्ती आहे. एका कवीचे एक गीत आहे कि , “प्रेम हि विश्वातील प्रत्येक गोष्टीची सार आहे”.

              प्रिती करण्याची क्षमता ही देवाची देणगी आहे. प्रिती हे सर्व भावनांमध्ये श्रेष्ठ आहे ती एक हृदयाची भाषा आहे. प्रत्येक व्यक्तीला प्रेमाची गरज आहे. प्रत्येक मानव प्रेम प्राप्त होण्यासाठी धडपडत आहे. एखाद्या तान्ह्या मुलाला प्रेम देऊ नका, ते मरुण जाईल किंवा ते मनाने किंवा शरीराने विकृति होइल. एखाद्या घरातून प्रेम काढून घ्या, ते घर क्षणात विखुरले जाईल.


            प्रेम हि मानवाची निकडीची गरज आहे, यामुळेच तो अश्या देवाच्या शोधात असतो. जो देव प्रिती, दया आणि समजून घेऊ शकेल. भारताच्या धर्म विकासात लोक अनेक देव-दैवता मध्ये वैयक्तिक प्रेमळ ईश्वराला शोधण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ते चालूच आहे.


                परंतु या दैवदेवतांच्या कथांनुसार वर्णन केलेले हे प्रेम मर्यादित स्वरूपाचे आहे, यामध्ये मोक्ष किंवा उद्धार हा फक्त धर्मीयासाठीच पहावयास मिळतो, पापी आणि वाईट जणांना तर आशाच नाहीये, कारण या दैवदेवतांच्या कथा सांगतात कि ते पाप्यांचा आणि दुष्टांचा नाश करण्यासाठीच आलेले आहे. परंतु पाप्याला सुधारण्याचा किंवा परिवर्तन आणण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही. खरे पाहता या सगळ्यामध्ये प्रेमळ देवाची व्याप्ती खूपच मर्यादित दिसून येते.


             या जगामध्ये कोण देव असा आहे कि, जो सर्व स्थितीत प्रिती करतो. पवित्र शास्त्र सांगते, “ देव प्रिती आहे.” देवाचा हा निस्वार्थ प्रेमळ स्वभाव हा केवळ येशू ख्रिस्तामध्ये पहावयास मिळतो .


            येशूख्रिस्ताच्या इतिहासामध्ये शुभवर्तमानाचा लेखक संत योहान याने, देवाची मानवाप्रती असलेलीप्रिती नमूद केले आहे.  
jesus on the cross
Jesus on the cross

त्याने लिहिले आहे कि, “ देवाने जगावर एवढी प्रिती केली कि त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अश्यासाठी कि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन (मोक्ष) प्राप्त व्हावे. देवाने प्रभू येशूख्रिस्ताला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले आहे ” (योहान. ३:१६-१७).


                    प्रभू येशुख्रिस्ताचे या भूतलावरील ‘कार्य व जीवन’ हे चांगल्या कामाचे पुरावे देतात. तो चांगली कामे करतच गेला. त्याने गरजुना मदत केली, भुकेल्यांना अन्न दिले, पाप्यांना क्षमा केली, आजाऱ्याना आरोग्य दिले, त्याने कुष्टरोग्याना स्पर्शाने बरे केले, आंधळ्याना दृष्टी दिली, लंगड्याना पाय दिले, बहिर्यांना कान दिले, मेलेल्यास जिवंत केले. ( अगदी मी देखील अश्या चमत्कारांची साक्ष देतो कि येशुख्रिस्ताच्या नावात चमत्कार होतात). त्याचे शब्द हे सांत्वन करणारे आणि भावी आशा देणारे आहेत.


    मानवतेचा खरा प्रेमी प्रभू येशूख्रिस्त, प्रेमाची व्याख्या अशाप्रकारे देतात की,“ आपल्या मित्राकरिता स्वता;चा प्राण द्यावा यापेक्षा कोणाची प्रिती मोठी नाही ”(योहान १५:१३). हे फक्त तो बोललाच नाही तर त्याने ते करून देखील दाखवले, जेव्हा त्याने कालवरीच्या वधस्तंभावर स्वता:चे  बलिदान केले. त्याच्या शिष्यांनी नमूद केले आहे कि, “ख्रिस्ताने आपणाकरिता स्वता;चे बलिदान केले यावरून आपल्याला देवाच्या प्रीतीची जाणीव झाली”(१ योहान. ३:१६).


                       येशुख्रिस्ताची प्रिती हि कुठल्याही ठराविक वेळेसाठी, जागेसाठी किंवा लोकांसाठीच नव्हती, तर याच  प्रिती द्वारे प्रत्येक स्त्री व पुरुष, मुले प्रत्येक वयोगटातील व्यक्तिगत गरज कोणत्याही अटीशिवाय पूर्ण  झाली . त्याने जाणीव करून दिली कि त्याची प्रिती कोणत्याही धार्मिक, सांस्कृतिक भौगोलिक आणि नैसर्गिक मर्यादा मानत नाही. 
jesus 

                  ख्रिस्ताने फक्त त्याच्या मित्रावरच नाही तर ज्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले व निंदा केली त्यांच्यावर देखिल त्याने प्रिती केली. एवढेच नव्हे तर त्याने क्रुसावर असताना त्यांच्यासाठी प्रार्थना सुद्धा केली कि, “ हे बापा त्यांना क्षमा कर कारण त्यांना कळत नाही कि ते काय करत आहेत.” त्याच्या प्रीतीने मृत्यूला जिंकले आणि तो आजही जिवंत आहे आणि प्रिती करत आहे.



     डॉ.राधाक्रिश्नन म्हटले कि, धर्माचा खरा सारांश म्हणजे वास्तवतेचा अनुभव होणे.आणि जेव्हां येशुख्रिस्ताशी समेट होतो तेव्हां हेच प्राप्त होते.तो जीवन बदलतो,आनंदित करतो, एक नवीन आशा देतो. तो पवित्रआत्मा देऊन आपल्या अंत;करणात प्रीतीचा वर्षाव करतो .    


                  ज्यांनी  ख्रिस्ताच्या या विनाअट प्रीतीचा अनुभव घेतला आहे ते जगालाही त्याची प्रिती कुठल्याही परिस्थितीत जाहीर केल्याशिवाय राहत नाही. संत पॉल, जो ख्रिस्ताकडे आकर्षित झाला. तो म्हणतो, ख्रिस्ताच्या प्रीतीमुळे मला त्रास होतो परंतु दुसऱ्या बाजूस तो म्हणतो कि, ख्रिस्ताच्या प्रितीपासून आपल्याला कोण विभक्त करील? क्लेश, आपत्ती , छळवणूक , उपासमार , नग्नता, संकट किंवा तरवार हि विभक्त करतील काय ? तर उलटपक्षी तो स्वताला म्हणतो , नाही, तर ज्याने आपणावर प्रिती केली त्याच्या योगे या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो. ख्रिस्तयेशु आपला प्रभू याच्यामध्ये देवाची आपल्या वरील जी प्रिती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करायला या गोष्टी समर्थ नाही”. ( रोम.८:३५-३९).


                        ख्रिस्ताची प्रिती हि खूप सामर्थ्यशाली व जिंकणारी आहे. एका संतांने गाईले आहे कि, “प्रिती हि किती आश्चर्यकारक आणि दिव्य आहे, माझ्या आत्म्याची, जीवनाची आणि सर्वस्वाची मागणी करते”.

द्वारे,                                                                                                                                                                                                                   डॉ. वर्गिस ल. मथाई (पीएच. डी)            


 

 

खरे प्रेम म्हणजे काय ? ऐकण्यासाठी वरील व्हिडिओ वर क्लिक करा  👆👆👂. 


Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url