How to Pray ? प्रार्थना कशी करावी ?
How to Pray ? प्रार्थना कशी करावी ?

praying in spirit

श्वास घेतल्याशिवाय कोणताही प्राणी जगू शकत नाही त्याप्रमाणे प्रार्थना केल्याशिवाय आपल्याला खिस्ती जीवन जगता येत नाही. शारीरिक वाढीसाठी अन्न तसे आत्मिक वाढीसाठी प्रार्थना आवश्यक आहे. प्रभू येशू ख्रिस्त या जगात असताना वेळोवेळी प्रार्थना करीत असे. त्याने विश्वासणाऱ्यांना कित्ता घालून दिला आहे.
मार्क१:३५ मग तो सकाळी मोठ्या पहाटेस उठून बाहेर गेला व रानात जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली. मत्तय१४:२३ मग लोकसमुदायांना निरोप दिल्यावर तो प्रार्थना करावयास डोंगरावर एकांती गेला. लूक६:१२ तो प्रार्थना करावयास डोंगरावर गेला आणि रात्रभर देवाची प्रार्थना करीत राहिला.
प्रार्थना म्हणजे देवाच्या सान्निध्यात राहून त्याच्याशी बोलणे व त्याची वाणी ऐकणे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने विश्वासणाऱ्यांना देवाच्या सान्निध्यात जाऊन सदासर्वकाळ देवाशी बोलता येते.
लूक.१८:१ त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये. १थेस्सल.५:१७ निरंतर प्रार्थना करा.
प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना प्रार्थना करायला शिकवले. मत्तय.६:९ ते १३ हा प्रार्थनेचा उत्तम नमुना आहे. आपण सर्व गोष्टींबद्दल प्रार्थना करावी आपली प्रार्थना स्वार्थी नसावी. केवळ स्वतःसाठी प्रार्थना करू नये. आपले कुटुंब, नातेवाईक शेजारी ओळखीचे लोक, मंडळी, देश, सुवार्ताप्रसार, छळले जाणारे लोक ... अशा गोष्टींविषयी प्रार्थना करावी.
प्रार्थना कशी करावी याविषयी पवित्र आत्मा आपल्याला मार्गदर्शन करतो.
रोम.८:२६ - आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही, पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य कण्हण्याने मध्यस्थी करतो. तो आपल्याला प्रार्थना करायला सुचवतो व प्रार्थना करण्यास साहाय्य करतो.
प्रार्थनेचे उत्तर मिळण्याच्या अटी 
Pray in Spirit

Pray in Spirit
प्रार्थनेचे चार भाग आहेत :

Prayer in spirit

उपकारस्तुति करावी.
‘ प्रार्थना ’ ख्रिस्ती मनुष्याचे 'गुप्त हत्यार' आहे (इफिस६).
इफिस.६:१८ - सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा.
पवित्र आत्मा ‘प्रार्थना' हे हत्यार वापरण्यास शिकवतो. प्रार्थनेत अमाप सामर्थ्य आहे कारण प्रार्थनेच्या द्वारे देवाच्या सामर्थ्याचे कार्य होते. प्रार्थना केल्याशिवाय ख्रिस्ती मनुष्याची वाढ होत नाही आणि त्याला सदाचारी जीवन जगता येत नाही.
वैयक्तिक प्रार्थना 
Personal-prayer
पवित्र शास्त्रवाचन व प्रार्थना करण्यासाठी
ख्रिस्ती व्यक्तीने नियमित वेळ निवडली पाहिजे. आपण नियमितपणे जेवतो तसे पवित्र
शास्त्राचे वाचन व प्रार्थना नियमितपणे केली पाहिजे. पुष्कळ लोक सकाळची वेळ
निवडतात. सकाळची वेळ सोयीची नसेल, तर जेव्हा शांत वेळ मिळतो
तेव्हा प्रार्थनेला बसावे. 'मला वेळ मिळेल तेव्हा मी प्रार्थना करीन' ही म्हटले
तर चालणार नाही. कारण आपल्याला कधीही वेळ मिळणार
नाही याबाबत आपण स्वतःला शिस्त लावली पाहिजे. देवाने विश्वासणाऱ्यांना आपल्या सान्निध्यात
राहण्याचा हक्क दिला आहे,
यासाठी प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर मेला. प्रत्येकाने या हक्काचे
महत्त्व ओळखावे व त्याप्रमाणे आचरण करावे.

Personal-prayer
वैयक्तिक प्रार्थनेचा उद्देश खालीलप्रमाणे आहे :
१) देवाशी सहभागिता स्तोत्र.४६:१० - शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मी देव आहे.
२) दिवसभरच्या कामासाठी सामर्थ्य व मार्गदर्शन मिळणे. इफिस.६:१२ कारण आपले झगडणे...तर सत्तांबरोबर,अधिकाऱ्याबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतीबरोबर,आकाशातल्या दुरात्म्याबरोबर आहे.
दररोजचे जीवन ख्रिस्ती व्यक्ती म्हणून जगण्यासाठी पवित्र शास्त्राच्या वाचनाने व प्रार्थना करण्याने विश्वासणारा पूर्णतेस पोचतो.
पवित्र शास्त्रवाचन
पवित्र शास्त्र हे ख्रिस्ती व्यक्तीचे अन्न आहे. शरीराला दररोज अन्नाची गरज असते, तसेच आत्मिक वाढीस पवित्र शास्त्र वाचणे आवश्यक आहे. आपण दररोज पवित्र शास्त्र वाचावे. त्याचा अभ्यास व मनन करावे. परीक्षेत पास होण्यासाठी विद्यार्थी मनापासून रात्रंदिवस शालेय पुस्तकांचा अभ्यास करतात. पवित्र शास्त्र शालेय पुस्तकापेक्षा मौल्यवान आहे. आपण अंतःकरणापासून त्याचा अभ्यास करावा. त्याच्या वचनाद्वारे देव आपल्याशी बोलतो, मार्गदर्शन करतो, शिकवतो,आपली पापे व उणिवा दाखवतो,प्रेरणा देतो व आशीर्वाद देतो.
१ पेत्र. २:२ - तारणासाठी तुमची आध्यात्मिक
वृद्धी व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बालकांसारखे निऱ्या दुधांची इच्छा धरा.
स्तोत्र.११९:१०५ - तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिवा व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे.
पवित्र शास्त्र वाचण्यापूर्वी पवित्र आत्म्याचे साहाय्य मागावे. तो देवाच्या वचनाचा उलगडा करतो.पवित्र शास्त्र क्रमाने वाचावे म्हणजे पवित्र शास्त्राचे संपूर्ण वाचन होते. आपण संपूर्ण पत्र काळजीपूर्वक वाचीत असतो. पवित्र शास्त्र हे देवाचे ‘पत्र' आहे. सर्व मजकर काळजीपूर्वक वाचलाच पाहिजे.
आपण जर आशीर्वादित झाला असाल तर जरूर आपल्या नातेवाईकास शेर करा .
शब्बाथ शनिवार आहे मग रविवार उपासना का ? यावर वाचण्यासाठी येथे क्लिक करा
खूप छान आणि व्यवस्थित बायबल आधारित माहिती आपण दिलीत. देवबाप आपणास अधिक आशिर्वादीत करो.