Yoga – A Christian Perspective
योगा – एक
ख्रिस्ती दृष्टिकोन
Yoga – A
Christian Perspective
आजच्या
आधुनिक युगात योगा हा जगभरात एक लोकप्रिय विषय झाला आहे. आरोग्य, ताणवमुक्ती आणि
मानसिक शांतीसाठी योगाचे महत्त्व अधोरेखित केले जाते. टीव्ही, शाळा,
जिम, आणि सोशल मीडियावर योगाचे महत्त्व,
आरोग्य फायदे आणि मानसिक शांतीसाठी त्याचा उपयोग सतत सांगितला जातो.
![]() |
| योगा – एक ख्रिस्ती दृष्टिकोन |
परंतु
प्रश्न असा आहे — बायबल योगाबद्दल काय सांगते ? आणि ख्रिस्ती व्यक्तीने योगा करावा
का?
हा प्रश्न समजून घेण्यासाठी आपण योगाचा उगम आणि बायबलची शिकवण समजून घेऊया .
योगाचा उगम आणि हेतू
“योगा”
हा संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ जोडणे किंवा एकत्व साधणे असा आहे. योगाचे मूळ
हिंदू धार्मिक आणि तत्त्वज्ञानिक परंपरेत आहे. योगाचा मुख्य हेतू म्हणजे मानवाच्या
आत्म्याचे ब्रम्हाशी एकरूप
होणे
— म्हणजे मोक्ष मिळवणे.
योगामध्ये प्रामुख्याने आसनं,
प्राणायाम, आणि ध्यान या क्रिया असतात ज्या मुळात आध्यात्मिक अनुभवासाठी बनविल्या गेल्या
आहेत. या सर्वांचा अंतिम हेतू आहे स्वतःमध्ये दडलेल्या देवत्वाचा शोध घेणे.
आज अनेक लोक योगाला केवळ शरीर तंदुरुस्त
ठेवण्याचा मार्ग म्हणून वापरतात. परंतु हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की योगाचे
मूळ धार्मिक व तात्त्विक आधार मूर्तिपूजक हिंदू धर्माशी संबंधित आहेत. त्यामुळे
ख्रिस्ती व्यक्तीने हे समजून घेतले पाहिजे की योगा हा फक्त व्यायाम नसून एक
आध्यात्मिक प्रणाली आहे.
म्हणून पारंपरिक योगा ही फक्त शरीरशास्त्र
नाही,
तर ती एक आध्यात्मिक तत्त्वज्ञानाची पद्धत आहे.
बायबलमधील ध्यान म्हणजे काय ?
काही लोक म्हणतात — “योगा म्हणजे ध्यान.
बायबलमध्येही मनन करण्यास सांगितले आहे, मग त्यात
चुकीचं काय?” पण येथे फरक समजून घेणे आवश्यक आहे. बायबलनुसार
मनन म्हणजे मन रिकामं करणे नव्हे, तर देवाच्या वचनाने मन
भरून काढणे होय .
स्तोत्र १:२ — “
तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या
नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य.”
यहोशवा १:८ — “नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या
मुखी सदैव असू दे; त्यात जे काही लिहिले आहे ते तू
काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर…”
बायबल आपल्याला सांगते की मननाचे केंद्र देवाचे
वचन आणि देवाचा स्वभाव असावा. तर योगामध्ये ध्यानाचे केंद्र स्वतःचा आत्मा,
ऊर्जा केंद्रे (चक्रे) किंवा विश्वातील शक्ती असतात.
हा एक मोठा फरक आहे — बायबल आपल्याला देवावर लक्ष केंद्रित करायला
सांगते, तर योगा मात्र माणसाला स्वतःमध्ये देव शोधायला
शिकवतो — जे बायबलच्या शिकवणीविरुद्ध आहे.
योगाचे आध्यात्मिक परिणाम आणि ख्रिस्ती उपासना
योगामध्ये काही आसनं आणि मंत्र हे हिंदू
देवतांना उद्देशून केले जातात. उदाहरणार्थ, “सूर्यनमस्कार”
ही क्रिया प्रत्यक्षात सूर्यदेवाला नमस्कार म्हणून तयार केली गेली. “ॐ” हे उच्चारदेखील
हिंदू देवतांच्या उपस्थितीचे प्रतीक मानले जाते.
बायबल आपल्याला स्पष्टपणे सांगते की
ख्रिस्ती व्यक्तीने इतर देवतांच्या उपासनेशी संबंधित कोणत्याही प्रथेत सहभागी होऊ
नये.
निर्गम २०:३ — “माझ्याशिवाय
तुला वेगळे देव नसावेत..”
१ करिंथ १०:२०–२१ — “परराष्ट्रीय जे यज्ञ
करतात ‘ते देवाला नव्हे तर भुतांना करतात’; आणि तुम्ही
भुतांचे सहभागी व्हावे अशी माझी इच्छा नाही.…”
ख्रिस्ती लोकांचे शरीर आणि आत्मा दोन्ही
देवाचे आहेत, त्यामुळे आपल्या कृतींनी देवाचा गौरव करावा
.
१ करिंथ ६:१९–२०
— “तुमचे शरीर, तुमच्यामध्ये वसणारा जो पवित्र
आत्मा देवापासून तुम्हांला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे हे तुम्हांला ठाऊक नाही
काय? आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही;
कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात; म्हणून तुम्ही आपले
शरीर [व आत्मा] जी देवाची आहेत त्याद्वारे देवाचा गौरव करा. ”
शरीर तंदुरुस्त ठेवण्याचे बायबलनुसार महत्त्व
बायबल आपल्याला शरीराची काळजी घेण्यास शिकवते.
आपले शरीर हे पवित्र आत्म्याचे मंदिर आहे.
१ करिंथ ६:१९–२०
— “तुमचे शरीर, तुमच्यामध्ये वसणारा जो पवित्र
आत्मा देवापासून तुम्हांला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे हे तुम्हांला ठाऊक नाही
काय? आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही;
कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात; म्हणून तुम्ही आपले
शरीर [व आत्मा] जी देवाची आहेत त्याद्वारे देवाचा गौरव करा. ”
म्हणून व्यायाम करणे,
शरीर तंदुरुस्त ठेवणे , हे सर्व योग्य आहे, जोपर्यंत
त्याचा उद्देश देवाला गौरव देणे हा आहे.
जर कोणी कवायत किंवा श्वसनाचे व्यायाम फक्त
शरीरासाठी करत असेल, आणि त्यात कोणतेही
आध्यात्मिक तत्व जोडलेले नाहीत, तर त्यात काही हरकत नाही. पण
जर त्या व्यायामाचा संबंध इतर देवतांच्या उपासनेशी किंवा आत्मिक शक्ती जागृत
करण्याशी असेल, तर ख्रिस्ती विश्वासनार्याने ते दूरच असावे .
पण समस्या तेव्हा उद्भवते,
जेव्हा योगाचे मूळ तत्त्वज्ञान ख्रिस्ती विश्वासाशी मिसळले जाते. बायबल
सांगते की मनुष्य देव नाही, तर ती देवाची निर्मिती आहे.
यशया ४२:८ — “मी परमेश्वर आहे; हे माझे नाम आहे; मी आपले गौरव दुसर्यास देऊ देणार नाही.
खऱ्या शांतीचा स्रोत कोण?
योगा शिकवतो की “शांती” स्वतःमध्ये आहे — मन
शांत केल्यास, देवत्व अनुभवता येते. परंतु बायबल
सांगते की खरी शांती स्वतःमध्ये नव्हे, तर येशू
ख्रिस्तामध्ये आहे.
योहान १४:२७ — “मी
आपली शांती तुम्हांला देतो; जसे जग देते तसे मी तुम्हांला
देत नाही.”
फिलिप्पै ४:७ — “देवाची शांती तुमच्या
हृदयांना आणि विचारांना येशू ख्रिस्तामध्ये राखील.”
ख्रिस्ती जीवनात शांती ही ध्यानाने नव्हे, तर देवाशी
नाते दृढ केल्याने मिळते.
योगा आणि ख्रिस्ती विश्वास
अनेकांना योगाचा आध्यात्मिक भाग निरुपद्रवी
वाटतो,
पण बायबल सांगते की काही आध्यात्मिक गोष्टी देवाकडून नसतात.
जर एखादी साधना आपल्याला देवापासून दूर नेते किंवा इतर आत्मिक
शक्तींशी जोडते, तर ती आपल्यासाठी धोकादायक ठरते.
१ योहान ४:१ — “प्रत्येक
आत्म्याचा विश्वास धरू नका, तर ते आत्मे देवापासून आहेत
किंवा नाहीत ह्याविषयी त्यांची परीक्षा करा.”
ख्रिस्ती व्यक्तीने प्रत्येक आध्यात्मिक
गोष्ट बायबलच्या प्रकाशात तपासावी. योगाच्या माध्यमातून स्वतःचा आत्मा किंवा
विश्वातील ऊर्जा शोधण्याचा प्रयत्न बायबलनुसार योग्य नाही,
कारण बायबल शिकवते की आत्मिक संबंध फक्त येशू ख्रिस्ताद्वारेच साधता
येतो (योहान १४:६).
ख्रिस्ती व्यक्तीने योगा करावा का?
योगा हा आरोग्यासाठी उपयुक्त वाटत असला तरी
त्याचे आध्यात्मिक तत्त्वज्ञान बायबलच्या शिकवणीशी सुसंगत नाही.अशा कोणत्याही
प्रथेत सहभागी होऊ नये जी देवाच्या गौरवाऐवजी स्वतःच्या गौरवावर भर देते.
जरूर, आरोग्याची
काळजी घ्या, व्यायाम करा, पण तुमचे मन,
आत्मा आणि ध्यान हे येशू ख्रिस्तामध्ये केंद्रित ठेवा. खरी शांती,
खरी विश्रांती आणि खरे समाधान हे योगामध्ये नव्हे, तर देवाच्या उपस्थितीत आणि त्याच्या वचनात मिळते.
“येशू म्हणाला, ‘तुम्ही
माझ्याकडे या, आणि मी तुम्हांला विश्रांती देईन.’” — मत्तय
११:२८
कृपया शेअर करा. आणि जलद अपडेटसाठी whatsapp group join करा .
धन्यवाद
