आशेचा किरण Ashecha Kiran
आशेचा किरण
![]() |
Ashecha-Kiran |
देव प्रीति आहे प्रांरभी देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली. देव मनुष्याचा व सृष्टि चा निर्माणकर्ता आहे. देवाचे आणि मानवाचे नाते प्रीतिमय होते. परंतु मनुष्याने देवाची आज्ञा मोडली . देवाची आज्ञा मोडणे म्हणजेच पाप होय. आणि पापाचे वेतन मरण आहे - पापा मुळे देवाचे आणि मनुष्याचे नाते तुटले आणि मनुष्याच्या जीवना मध्ये दुःख, आजार, मृत्यु यांचा प्रवेश झाला.
देवाशी तुटलेली सहभागीता व नाते जोडण्यासाठी मनुष्याने वेगवेगळ्या मार्गाने खुप प्रयत्न केले ,जसे कि, प्राण्यांचे बलिदान देणे, नवस करणे परंतु हे पुरेसे नव्हते . म्हणुंन मनुष्याशी तुटलेले नाते पुर्नस्थापित करण्यासाठी देवाने एक उपाय योजीला देवाने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभुयेशुला या जगात पाठविले.
प्रभु येशुचा जन्म पवित्र आत्म्याच्याद्वारे कुमारी मरियाच्या पोटी झाला. प्रभु येशु जगामध्ये असताना त्याने. अवघ्या मानव जातीला प्रीतीचा संदेश दिला. जशी आपल्या वर तशी आपल्या शेजाऱ्या वर प्रीति करा, जे तुमचे शत्रु आहेत त्यांना क्षमा करा आणि जे गोरगरीब, अनाथ, गरजवंत यांना मदत करा .
तसेच, आंधळ्यांना दृष्टि दिली, मुक्यांना वाचा दिली, रोग्यांना बरे केले, मेलेल्यांना जीवंत केले असे अनेक चिन्ह चमत्कार केले परंतु या या सर्वाद्वारे तारण मिळणे शक्य नव्हते .
![]() |
miracles-of-jesus |
तर प्रभु येशु ख्रिस्ताने सर्व मानवाच्या पापाची शिक्षा स्वतः वर घेऊन वधस्तंभावर प्रभु येशु मरण पावला त्याला कब्रेत पुरण्यात आले. त्याच्याविषयी केलेल्या भविष्यवाणी नुसार तिसऱ्या दिवशी मेलेल्यातूंन तो पुन्हा जीवंत झाला-स्वर्गात गेला . तो तेथून [स्वर्गातुन] जीवंताचा व मेलेल्यांच्या न्याय करायला गौरवाने पुन्हा पृथ्वी वर येणार आहे. येशु ख्रिस्त सर्वांचा प्रभु व तारणारा आहे.
![]() |
Crucification-of-jesus |
देव भेद-भाव करत नाही तर सर्वांवर सारखीच प्रीति करतो. जो कोणी प्रभु येशु ख्रिस्तावर विश्वास ठेवतो व पश्चात्ताप करतो देव त्याच्या सर्व पापांची क्षमा करून त्या व्यक्तीला सार्वकालीक जीवन विनामूल्य देतो. तर प्रियांनो प्रभु येशु वरती विश्वास ठेवल्याने आपल्याला सर्व पापांची क्षमा, सार्वकालीक जीवन, प्रीति, आनंद, शांती प्राप्त होते. आपले देवाशी तुटलेले नाते पुर्नस्थापित होते.
तर मग आता उशीर करू नका दिवस वाईट आहेत-न्यायाचा समय जवळ आला आहे . संधी आहे तोच आपल्या सर्व पापांचा पश्चाताप करून प्रभु येशु ख्रिस्ताला आपला तारणारा व प्रभु म्हणून आपल्या अंत:करणात स्वीकार करा व तुमचे जीवन त्याला समर्पित करा. प्रभु येशुचा अनुभव घ्या की तो किती चांगला आहे .
देव तुम्हास आशीर्वादित करो.
अधिक स्पष्टीकरण व्हिडीओ बघण्यासाठी येथे 👇 क्लिक करा
अधिक माहिती व प्रार्थनासाठी निसंकोच संपर्क
स्थानिक चर्च किंवा
मो. ९२७००४७३१६