देव माझा मेंढपाळ आहे. The lord is my shepherd.
परमेश्वर माझा मेंढपाळ आहे.
आज आपण २३ वे स्तोत्र पाहणार आहोत .कारण पुष्कळ लोकांना या स्तोत्रातून त्यांच्या कठीण परिस्तिथीत मोठी उर्जा आणि आशा
प्राप्त होते.
स्तोत्र २३
परमेश्वर माझा मेंढपाळ आहे
१.परमेश्वर माझा मेंढपाळ आहे; मला काही उणे पडणार नाही.
२.तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो; तो मला संथ पाण्यावर नेतो.
३.तो माझा जीव ताजातवाना करतो; तो आपल्या नावासाठी मला नीतिमार्गांनी चालवतो.
४.मृत्युच्छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही,
कारण तू माझ्याबरोबर आहेस; तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात.
५.तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्यापुढे ताट वाढतोस;
तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस;
माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे.
६.खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील;
आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन.
![]() |
देव-माझा-मेंढपाळ-आहे.,the_lord_is_my_shepherd. |
या अध्यायात दावीद देवाबद्दल वैयक्तिक जिवनशैलीतून बोलतो. बहुतेकांचा हा अध्याय आवडता आहे. तो म्हणतो कि , “परमेश्वर माझा मेंढपाळ आहे”. आज आपण बघू या कि, दावीद असे का म्हणतो कि , “परमेश्वर त्यांचा मेंढपाळ आहे”.
१ . तो मला ओळखतो स्तोत्र २३;१
दावीद गातो कि, ‘परमेश्वर माझा मेंढपाळ आहे’. या विधानामुळे त्या काळच्या वाचकांना जरा धक्का बसतो, कारण जुन्या काळात इस्राएल देवाबद्दल “आपला देव” असे विधान करत अनुवाद ६:१ इस्राएलचा देव हा वैक्तिक देखील देव आहे हे ते विसरत होते . मला वाटते म्हणूनच येशूने लूक १५;३-७ मध्ये “हरवलेली मेंढरु ” हा दाखला सांगीतला आहे .
एकाच कळपात १० किंवा शेकडो मेंढरे असू शकतात. एक चांगला मेंढपाळ कळपातील प्रत्येक मेंढराला ओळखतो, मग ते संख्येने कितीही असो. योहान १०;३-५ . दविद देवाचे वर्णन करण्यासाठी मेंढपाळ या रूपकाचा केवळ उपयोग करत नसून खरे तर तो देव आणि त्याच्या कराराच्या मुलांमधील नाते स्पष्ट करत आहे .
जगात आज किमान ७.०८१ अब्ज लोक आहेत. आणि बायबल म्हणते की देव या लोकांपैकी प्रत्येकाला त्यांच्या नावाने ओळखतो.
तो केवळ आपणास ओळखतच नाही तर त्यास आपली काळजीही आहे. बायबल म्हणते की त्याने जगावर इतके प्रेम केले की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला अनंतकाळचे जीवन प्राप्त व्हावे . योहान ३;१६
२. मला काही उणे पडणार नाही .स्तोत्र २३;१-३
मेंढरे त्यांच्या गरजा मेंढपाळास सांगू शकत नाही. तरीही मेंढपाळांना कळपातल्या प्रत्येक मेंढराच्या गरजा नैसर्गिकरित्या कळतात. त्याचप्रमाणे, मत्तय ६;८ म्हणते की आम्हाला इतर लोकांप्रमाणे ढोंगी प्रार्थना करण्याची गरज नाही कारण आपला निर्माणकर्ता देवास आपण मागण्यापुर्वीच आपल्या गरजा त्यास माहित आहे .
जेथे विपुल हिरव्यागार कुरण असते, तेथुन मेंढ्याना तृप्त होण्यासाठी दुसर्या ठिकाणी जाण्याची आवश्यक नाही. हिवाळ्यात व पावसाळ्यात सर्वत्र हिरवेगार असतेच अगदी वाळवंटातही . परंतु उन्हाळ्यात अगदी या उलट असते , अशावेळी मेंढ्यांना अन्नाच्या शोधात ठिक-ठिकाणी न्यावे लागते . परंतु देव आपणास सर्वपरिस्थितीत विपुलपणे पुरवठा करतो.
मेंढपाळ मेंढ्यांना नदीवर वाहणारे पाणी पिण्यास नेत नाहीत कारण पाणी पिण्यासाठी झुकताना मेंढरेही त्यात पडण्याची भीती असते . म्हणून आपण जुन्या करारात पाहतो कि, मेंढपाळ विहिरींमधून पाणी शेंदून मेंढरांना पाणी पाजत. आणि शिवाय मध्ये-पूर्वेतील या विहिरी फार खोल असत.
होय ‘ आपणास ही आपल्या गरजासाठी चिंता करण्याची गरज नाही कारण आपला मेंढपाळ आपल्या गरजा जाणुन आहे. परमेश्वर आपणास त्याच्या दैवी तरतुदीची हमी देतो. मत्तय ६;२५-३४ . तथापि देव लोभी लोकांना देत नाही . तर जे खरोखर विश्वासू आणि गरजवंत आहेत त्यांची तो काळजी घेतोच . नीतिसूत्रे ३०;८ , याकोब ४;१-३
३. तो मला ताकत देतो.
मेंढरे
इतर प्राण्याप्रमाणे चतुर नसतात म्हुणुन त्यांच्यामध्ये कुत्रा यासारखे प्राणी ठेवतात
. जे सदोदित त्याच्या मागे असतात. होय देव आपल्या कमजोरी भरून काढतो.
एक उत्तम मेंढपाळ आपल्या कळपाची नियमितपणे तपासणी करतो आणि जर त्यास काही आढळले तर लगेच त्यांना औषधपाणी करतो .
लागुकरण
मेंढरांप्रमाणेच आम्हीसुद्धा स्वतःला सैतानाच्या योजनांपासून बचाव करण्यास असमर्थ आहोत. स्तोत्र ५१:५ आमच्या पातकी स्वभावामुळे आपण कायम पापात पडतो . आणि स्व;बळावर म्हणतो , आता मी ते पाप पुन्हा करणार नाही .परंतु अशा वेळी आपण पश्चात्ताप केला पाहिजे आणि स्वतःला प्रभूच्या हातात स्वपवून त्यास कार्य करून दिले पाहिजे. आणि एकदा पश्चात्ताप केल्यानंतर अपराधीपणाच्या भावनां येऊ देऊ नयेत .
आपण पाहतो लूक २२:६१,६२ मध्ये पेत्राने पश्चात्ताप केला आणि प्रभुने त्यास क्षमा केली .
दुसरीकडे यहूदाने या उलट काम केले मत्तय २७;३-५ मध्ये त्याने पश्चात्ताप करण्याऐवजी स्वताःला प्रभूच्या हातात न पडता अपराधीपणाच्या भावनां येऊ दिल्या आणि जीवन संपवून घेतले.
४. तो मला मार्गदर्शन करतो. स्तोत्र २३;३
मेंढपाळास उत्तम हिरवळ कोठे आहे हे ठाऊक असते. अशाच ठिकाणी तो मेंढरांना नेतो . या वचनात दावीद देवाबद्दल हेच सांगत आहे कि, देवाने त्याच्या राज्याच्या कारकिर्दीत त्याला सरळ मार्ग दाखवले आणि मोठी युध्ये जिंकण्यास त्यास सक्षम केले.
लागुकरण ;
जीवनातील बहुतेक समस्या या देवाच्या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष केल्याचा परिणाम आहे . जर देवाच्या मार्गदर्शनाकडे लक्ष दिल्यास आपण आपल्या वैयक्तिक जीवनात संसार, नौकरी आणि सेवा या प्रत्येक प्रसंगाचा आनंद घेऊ शकतो. आमच्यासाठी सर्वात उत्तम काय आहे हे त्याला ठाऊक आहे आणि जोपर्यंत आपली उद्दिष्ट्ये शुद्ध आणि त्याच्या इच्छेच्या चौकटीमध्ये आहेत तोपर्यंत ती साध्य करण्यास तो आम्हास मदत करेल.
४. तो माझे रक्षण करतो. स्तोत्र २३;४अ
दावीद, या ओळीत ‘मृत्यूछाया’ या शब्दातून मृत्यू किंवा घनदाट अंधाराचे वर्णन करत आहे. या ठिकाणी तो मेंढपाळ पार पाडीत असलेली जाबाबदारी व घेत असलेली जोखीम बद्दल सांगत आहे. कारण एकाच वेळी मेंढपाळास खोल दरीमध्ये कुरणात कळपास चालवणे व चालताना तीक्ष्ण व निसरड्या खडकावर जपून पावले टाकावी लागत . शिवाय या दऱ्यामध्ये बिबट्यासारख्या वन्य प्राण्यांचे वास्तव्य असत.
तरीही मेंढरास मेंढपाळाच्या मागे जाणे गरजेचे असे . या सर्व परीस्थित मेंढरांना काळजी करण्याची गरज नव्हती कारण मेंढपाळ या हिंस्र प्राण्याचा सामना करीत, १ शमुवेल१७:३४-३६.
दऱ्या मधील अंधार हा दाविदाच्या जीवनात वेगवेगळ्या प्रसंगाचे प्रतीक आहे. गल्याथावर विजय हा चांगल्या-वाईट अशा दोन्ही गोष्टींचा दाविदाच्या जीवनातील अद्भुत टप्पा होता. या कृतीद्वारे त्याने नकळतपणे इस्राएल लोकांची मने जिंकली होती. म्हणून तर शौलने त्याचा हेवा केला .
मृत्यू सर्वत्र दावीदचा पाठलाग करत होता. कईला येथे पलिष्ट्यांनी दाविदासामोरून पळ काढला. परंतु पुढे, दाविदास स्वतःचा जीव वाचावण्यासाठी पळावे लागले . १ शमुवेल२३ : १-२९. जेव्हा देव दाविदास राजा करू पहात होता. तेव्हा तो खरोखरच मृत्यूछायेच्या दरीतून जात होता . ज्याप्रमाणे मेंढपाळ आपल्या कळपाला मृत्यूछायेच्या दरीतून हिरव्यागार कुरणात नेतो. परंतु मृत्यूछायेच्या दरीतही त्याजवर देवाचा बचावाचा हात होता. दावीदाच्या आयुष्यात देवाची उपस्थिती मृत्यूछाये पेक्षा अधिक सामर्थ्यवान होती १ शमुवेल २३;१४.
जीवनातील समस्या या लपवता येत नाहीत . त्याना सामोरे जावेच लागते . पुष्कळ वेळा समस्यामुळे आपणास तणावातून जावे लागते. अशा वेळेस देवच आपणास साह्य करतो .
५. तो मला धीर देतो . स्तोत्र २३;४ब
काठी व आकडी एकच वस्तू आहे . मेंढपाळांना त्याचा ४ ठिकाणी उपयोग होतो .(काठी हे मेंढ्यांवरील त्याच्या अधिकाराचे प्रतीक सुद्धा आहे.)
प्रथम - जे हिंस्र प्राणी विशेषतः मेंढरांवर झडप घालत त्या सिंह, बिबट्या, अस्वल, आणि लांडगे यासारख्या प्राण्यांशी लढा देण्याकरिता काठीचा उपयोग केला जात .
दुसरे - म्हणजे, मेंढपाळ आकडीचा उपयोग जर एखाद्या मेंढराने कळपातून पळ काढला तर त्यास पुन्हा कळपामध्ये आणण्यासाठी उपयोग करत.
तिसरे - मेंढपाळ मेंढरांची तपासणी करण्यासाठी काठीचा उपयोग करत . तो मेंढीची लोकर काठीच्या साह्याने त्वचेपासून दूर करून जखमा किंवा खर्चटणे तपासण्यासाठी वापर केला जात.
चौथे - मेंढ्या मोजण्यासाठी. जुन्या करारात मेंढपाळ मेंढीवर आपली काठी ठेवून दरवाजातून आत गेलेल्या प्रत्येक मेंढरांची गणना करीत. जर त्यास आढळले की त्यातील एखादे हरवले आहे, तर तो काय करी ? तो इतर सर्व मेंढरे विश्वासू सेवकाकडे ठेवत आणि हरवलेल्याचा शोध घेण्यासाठी बाहेर पडत.
लागुकरण;
काठी व आकडी ही मेंढराच्या मदतीसाठीच आहे . ही काठी व आकडी दुसरे काही नसून आपल्यासाठी देवाचे वचन आहे जे आपणास देवाबरोबर चालण्यास मदत करते . मी सुरुवातीला नमूद केले की काठी व आकडी ही मेंढीवरील अधिकाराचे प्रतीक आहेत. त्याचप्रमाणे, जेव्हा आपण स्वेच्छेने स्वत: ला देवाच्या अधीन करतो तेव्हा देवाचे वचन आपल्या जीवनात सांत्वन व धीर उत्पन्न करते .
मेंढपाळाची काठी व आकडी म्हणजेच देवाचे वचन हे आपणास ;
प्रथम ; आपणास मोहांचा प्रतिकार करण्यास मदत करतो, स्तोत्र ११९;११.
दुसरे ; म्हणजे ते चुकीचे निर्णय घेण्यास प्रतिबंध करते, स्तोत्र १११९;१०५
तिसरे ; वचन आपले अंतःकरण पारखते, इब्री ४;१२
चौथा ; वचन आपले पाप उघड करून आपणास ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे वळवते , प्रेषित २ : ३७-४०
७ तो मला उंचावतो.
स्तोत्रे २३;५,६
हे वचन मोठ्या समास्यातही परमेश्वराच्या विश्वासूपणाचे वर्णन करते. दावीदाच्या आयुष्यात अशा लोकांची कमतरता नव्हती कि, ज्यांनी त्याचा हेवा केला व त्याच्या मृत्यूची इच्छा केली.
उदा:
- राजा शौल. १ शमुवेल १८;७-१० - नृत्य करणार्या स्त्रिया आळीपाळीने येणेप्रमाणे म्हणत : “शौलाने हजारो वधले, दाविदाने लाखो वधले.”हे ऐकून शौलाला फार क्रोध आला; हे त्यांचे शब्द त्याला आवडले नाहीत;
- अगदी त्याच्या जवळचे लोक १ इतिहास २७;३३ ; २ शमुवेल१५;३१ - कोणी दाविदाला सांगितले की, “अहिथोफेल हाही बंडखोरांना सामील होऊन अबशालोमाबरोबर आहे.” हे ऐकून दावीद म्हणाला, “हे परमेश्वरा, अहीथोफेलाची मसलत फोल कर.”
- त्याचा स्वतःचा मुलगा २ शमुवेल १६:११. -“पाहा, प्रत्यक्ष माझा पुत्र, माझ्या पोटचा गोळा, माझा जीव घ्यायला पाहत आहे,
तरीही स्तोत्र २५:३ म्हणते की देवाने दाविदाला उच्च केले आणि त्याचा सन्मान केला , त्याने त्याच्या शत्रूंना पूर्णपणे लज्जित केले. (त्या दिवसात, मेजवानीस आलेल्या आमत्रीतास सुगंधित जैतुनाच्या तेलाने अभिषेक करण्याची प्रथा होती )
माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे . याचा अर्थ असा आहे की “पात्रात विपुल पेय आहे”. येथे मेंढपाळाच्या कपाचा संदर्भ आहे , जो चाळीस ते पन्नास गॅलन चा मोठा पोकळ दगड होता आणि त्यातून मेंढरे पाणी पीत .
लागुकरण ;
एकच देव आहे . दावीद एक कुशल योद्धा होता. ज्याला देवाने बोलाविले व अभिषेक केला ,ज्याने आपल्या लोकांची मने जिंकली.
तथापि, त्याने आपल्या शत्रूला स्वतःचे सामर्थ्य दाखविण्याचा प्रयत्न केला नाही. हे गल्याथ विरूद्धच्या त्याच्या लढाईत दिसून आले १ शमुवेल १७;३४-४७.
त्याने आपल्या शत्रूंचा सूड घेण्याचा कधीही प्रयत्न केला नाही, हे आपणास शौलच्या दुष्टपणाबद्दल त्याच्या प्रतिक्रियेतून दिसून आले १शमुवेल २४;१-२२ . त्याचा असा विश्वास होता की युद्ध आणि सूड हे दोन्ही ही देवाचे आहेत रोम १२;१९ . यावरून असे दिसते कि, त्याने परमेश्वराची वाट धरली.
आपण येथेच चुकतो .आपण देवाला कार्य करून देत नाही . म्हणून देव आपणास शत्रूंसमोर आमचा सन्मान किवा उंच करत नाही तसेच संकटसमयी आपले पात्र भरभरून वाहत नाही . चला तर मग आपण आपला सूड व आपले युद्ध देवाच्या हातात देऊ या .
येशूने देखील आपल्या शिष्यांना त्यांच्या शत्रूंवर प्रेम करण्याची आणि त्यांचा छळ करणार्यासाठी प्रार्थना करण्याची आज्ञा दिली. मत्तय ५;४४
सारांश
कदाचित आज तुमच्यापैकी असे काही आहेत ज्यांना आपल्या आयुष्यात देव मेंढपाळ असल्याचा अद्यापपर्यंत अनुभव आला नसेल आणि तुम्हाला आश्चर्य वाटेत असेल कि माझ्याबाबत असे का? मी या संदेशाच्या सुरूवातीस सांगितले की, मेंढपाळ हे रूपक देवाने आपल्या कराराच्या मुलांबरोबर केलेला नातेसंबंध प्रकट करण्यासाठी केला आहे.
आता तुम्ही प्रश्न कराल की, कराराचे मूल याचा अर्थ काय आहे आणि मी कसे त्याचे मुल होऊ शकतो ?
मी हे आपणास एका सोप्या मार्गाने समजावून सांगतो. करार हा मुळात दोन किंवा अधिक लोकांमध्ये संघानुमते घेतलेली वचने किवा शपथ असते . मानवांशी आता देवाचे नाते हे नेहमीच एक कराराचे नाते आहे. हा करार म्हणजे मोशेच्या द्वारे दिलेल्या नियमशास्त्राशी विश्वासू राहणे होय . या नियमशास्त्राचे उल्लंघन करणे म्हणजेच पाप करणे किंवा देवापासून वेगळे होणे होय. उल्लंघन केल्यास याचे प्रायचित्त होण्यासाठी पापर्पण म्हणून निर्दोष प्राण्यांचे बलिदान करणे अगत्य होते.
कि, ज्यामुळे पुढील गोष्टींची पूर्तता होई .A. उपासकाची परिपूर्णता इब्री १०;१… उपासने द्वारे परीपुर्णता येते ...
B. उपासकाचे शुद्धीकरण इब्री १०;२ … एकदाच सर्वासाठी शुद्ध केले गेले असते...
C. उपासकांचा अपराधीपणा इब्री १०:२-३… यापुढे त्यांच्या पापांसाठी अपराधीपणाची भावना नाही.
D. उपासकाचा निर्दोषपणापणा इब्री १०;४ ... पाप काढून घेण्यासाठी ...
तथापि, प्राण्यांचे बलिदान वरीलपैकी काहीही साध्य करू शकले नाही कारण, पशूंचे यज्ञ हे केवळ येणाऱ्या योजनाची सावली असे होते , इब्री लोकांस १०;१ शिवाय ते अपूर्ण होते . इब्री १०;१,२ .
जर प्राण्यांचे बलिदान निष्फळ होते तर देवाने निर्दोष प्राण्यांचे बलिदान करण्याची आज्ञा का दिली ? देवाची इच्छा होती की लोकांना समजले पाहिजे कि, पापाचे वेतन मरण आहे . आणि हे पूर्ण होण्यासाठी अशा व्यक्तीच्या रक्ताची गरज होती कि, जो अगदी निष्पाप असेल .
म्हणूनच देवाचा पुत्र प्रभूयेशू याचा जन्म कुमारीद्वारे या जगात झाला. बायबल म्हणते की ज्याला पाप ठाऊक नव्हते अशा येशूला देवाने आपल्यासाठी पाप केले जेणेकरून त्याच्यामध्ये आपणास देवाचे नीतिमत्व प्राप्त व्हावे, २ करिंथ ५:२१.
येशूच्या बलिदानाने आमच्या पापाची दंडात्मक भरपाई झाली . आता येथूनपुढे पशू यज्ञांची गरज राहीली नाही आणि आता हा नवीन करार आहे ज्याद्वारे आपण देवासोबत अतुलनीय नातेसंबंधचा आनंद उपभोगत आहोत. जो कोणी त्याला स्वीकारतो त्यास देवाचा [ कराराचा ] मुलगा होण्याचा अधिकार मिळतो . आशाप्रकारे तुमच्या जीवनात देवाला मेंढपाळ होण्याचा हक्क मिळतो , योहान१:१२.