how to use time वेळेचा सदुपयोग करा.
वेळेचा सदुपयोग करा,कारण दिवस वाईट आहेत. (ईफिस ५;१६)
(योहान २;४ ) जेव्हा मरिया येशुला द्राक्षरस
संपल्याचे सांगते येशु उत्तर देतो कि ,”माझी वेळ अजुन आली नाही.” म्हणजेच परमेश्वर देवाने प्रत्येक
घटना किंवा कार्य हे ठरविक वेळेतेच नेमून ठेवले आहे.
येशुच्या जन्माला येण्याची
वेळ सुद्धा निश्चित होती. (ग़लती ४;४ ) सांगते की, परंतु काळाची पूर्णता झाली,
तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले .
जोपर्यंत संधी आहे तोपर्यंतच त्याचा लाभ घ्यायचा आहे. अन्यथा पदरात निराशा पडते.पापक्षमा,पश्चाताप, तारण जोपर्यंत संधी आहे तोपर्यंतच प्राप्त केले पाहिजे.
कारण( नीति २७;१) सांगते " उद्याची खातरी मानू नकोस, कारण एका दिवसात काय होईल हे तुला कळत नाही"
यालाच अनुसरण आपण एक दाखला बघुया (लुक १६ ; १९ -३१)
१९ श्रीमंत मनुष्य व दरिद्री लाजर या दाखल्यात वाचतो की, श्रीमंत मनुष्य जांभळी व तलम वस्त्रे घालत असे, आणि दररोज थाटामाटाने ख्यालीखुशाली करत असे.
यालाच अनुसरण आपण एक दाखला बघुया (लुक १६ ; १९ -३१)
१९ श्रीमंत मनुष्य व दरिद्री लाजर या दाखल्यात वाचतो की, श्रीमंत मनुष्य जांभळी व तलम वस्त्रे घालत असे, आणि दररोज थाटामाटाने ख्यालीखुशाली करत असे.
![]() |
lazaras |
20 त्याच्या दरवाजाजवळ फोडांनी भरलेला लाजर
नावाचा एक दरिद्री माणूस टाकण्यात आला होता;
21 त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली पडेल
त्यावर आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा असे; शिवाय कुत्री येऊन त्याचे फोड चाटत असत.
22 पुढे असे झाले की, तो दरिद्री माणूस मेला आणि देवदूतांनी त्याला अब्राहामाच्या उराशी नेऊन ठेवले; श्रीमंतही मेला व त्याची उत्तरक्रिया
करण्यात आली.
23 तो अधोलोकात यातना भोगत असताना त्याने
आपली दृष्टी वर करून अब्राहाम व त्याच्या उराशी बसलेला लाजर ह्यांना दुरून पाहिले.
24 तेव्हा त्याने हाक मारून म्हटले, ‘हे बापा अब्राहामा, माझ्यावर दया करून लाजराला पाठव, ह्यासाठी की
त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी; कारण ह्या जाळात
मी क्लेश भोगत आहे.’
25 अब्राहाम म्हणाला, ‘मुला, तू आपल्या आयुष्यात आपले सुख भरून पावलास, तसा लाजर आपले दुःख भरून पावला, ह्याची आठवण कर; आता ह्याला येथे समाधान मिळत आहे व तू क्लेश भोगत आहेस.
26 एवढेच नव्हे तर जे इकडून तुमच्याकडे पार जाऊ पाहतात त्यांना जाता
येऊ नये म्हणून व तिकडून कोणी आमच्याकडे येऊ नये म्हणून
आमच्या व तुमच्यामध्ये मोठी दरी स्थापलेली आहे.’
27 मग तो म्हणाला, ‘तर बापा, मी विनंती करतो, त्याला माझ्या बापाच्या घरी पाठव;
28 कारण मला पाच भाऊ आहेत; त्यांनी तरी ह्या यातनेच्या स्थळी येऊ
नये म्हणून त्याने त्यांना इकडची साक्ष द्यावी.’
29 पण अब्राहामाने त्याला म्हटले, ‘त्यांच्याजवळ मोशे व संदेष्टे आहेत, त्यांचे त्यांनी ऐकावे.’
29 पण अब्राहामाने त्याला म्हटले, ‘त्यांच्याजवळ मोशे व संदेष्टे आहेत, त्यांचे त्यांनी ऐकावे.’
30 तो म्हणाला, ‘हे बापा अब्राहामा, असे नाही; पण मेलेल्यांमधून कोणी त्यांच्याकडे गेला तर ते पश्चात्ताप
करतील.’
![]() |
Rich man |
श्रीमंत मनुष्य पश्चात्ताप करतो परंतु
वेळ गेल्यानंतर
प्रियानो ज्याप्रकारे तुम्ही शारिरिक जिवनात गंभीर अहात त्याचप्रकारे आत्मीक जिवनात गंभीर आहात का ? श्रीमंत मनुष्य हा केवळ शारिरिक जिवनातच गंभीर दिसतो. त्याच्या जिवनात कुठ्लेहि देवाचे
भय दिसत नाही, मात्र नरकात गेल्यानंतर त्याला पश्चात्ताप होतो, परंतु त्याने पश्चात्तापाची योग्य वेळ गमावलेली असते .आज रोजी सरकार अपणास बाहेर जाण्यास मनाई करत आहे . कारण सध्या
बहेर कोरोना व्हायरस आहे . आणि जर आपण उल्लंघन करुन बाहेर जाऊ तर कोरोना व्हायरसची लागण होण्याची शक्यता
नाकारता येत नाही. जर आपल्याला पुढिल आयुष्य उत्त्म हवे आहे तर आजच्या वेळी आपण बाहेर
जाऊ नये, अन्यथा लॉकडाउन असल्या कारणाने सर्वकाही बंद आहे , शाळा, कार्यलये ,बस, रेल्वे चर्चेस , मंदिरे सर्वकाही बंद आहे. आपण नेहमीप्रमाने उपासनेला जाऊ शकत नाहिये.
(आमोस ८;11) प्रभू परमेश्वर म्हणतो, “पाहा, असे दिवस येत आहेत की त्यांत मी देशावर दुष्काळ आणीन. तो दुष्काळ पाण्याचा नव्हे, अन्नाचा किंवा पाण्याचा नव्हे, तर तो परमेश्वराची वचने ऐकण्यासंबंधीचा होईल.
![]() |
Quite time |
आज आपन युटुब,फेसबुक च्या माध्यमातुन वचन
एकत आहोत ,परन्तु येणाऱ्या काळात
सर्वच मार्ग बंद होणार आहेत .