गर्भपाताबाबत बायबल काय म्हणते? Biblical view on abortion in Marathi
गर्भपात पाप आहे का ?
Biblical view on abortion in Marathi
गर्भपाताबाबत बायबल काय म्हणते?
आजच्या आधुनिक जगात गर्भपात हा सामाजिक,
वैद्यकीय आणि नैतिक अशा तिन्ही स्तरांवर चर्चेचा विषय बनला आहे. परंतु
ख्रिस्ती दृष्टिकोनातून पाहिले, तर जीवन हे देवाचे वरदान आहे.
पवित्र शास्त्रात गर्भपात या शब्दाचा थेट उल्लेख
नाही,
परंतु पवित्र शास्त्रात न जन्मलेल्या मुलांबद्दल सांगण्यासारख्या
अनेक महत्त्वाच्या असंख्य शिकवणी आहेत, ज्या
गर्भपाताविषयी देवाचे मत काय आहे हे उत्तमप्रकारे स्पष्ट करतात. बायबल सूचित करते की न जन्मलेले देखील व्यक्ती असतात. त्या देवाच्या
जीवनदायी योजनेचा भाग आहेत .
१. देव जीवनाचा निर्माता आहे
(उत्पत्ति २:७) - “देवाने मातीपासून मनुष्य
बनविला आणि त्याच्या नाकात जीवाचा श्वास फुंकला.”
प्रत्येक जीवन देवाकडून येते. मनुष्याला
स्वतःचे किंवा दुसऱ्याचे जीवन संपवण्याचा अधिकार नाही.
गर्भपात म्हणजे देवाच्या अधिकारात मानवी हस्तक्षेप — जो देवाच्या
इच्छेविरुद्ध आहे.
२. गर्भातील बालक देवाच्या दृष्टीने ‘जीवंत
आत्मा’ आहे
लूक १:४१
_ जेव्हा अलीशिबाने मरीयेचे अभिवादन ऐकले, तेव्हा
तिच्या बाळाने तिच्या पोटात उडी मारली आणि अलीशिबा पवित्र आत्म्याने भरून गेली.
न जन्मलेल्या बाळामध्ये पाप आणि आनंद
यासारखे वैयक्तिक गुण असतात.
स्तोत्र 5१:५ मध्ये दावीद म्हणतो, " पाहा, मी जन्माचाच पापी आहे; माझ्या आईने गर्भधारण केले
तेव्हाचाच मी पातकी आहे.
लूक
१:४४ _ कारण जेव्हा तुझ्या अभिवादनाचा आवाज माझ्या
कानावर आला, तेव्हा ते बाळ माझ्या उदरात आनंदाने उड्या मारत
होते.
गर्भाशयात येण्यापूर्वीपासून देव आम्हास जाणतो. यातून दिसते की गर्भातील बालक हे देवाच्या दृष्टीने पूर्ण व्यक्ती आहे.
“तूच माझ्या आईच्या उदरी माझी घडण केलीस.......मी
गर्भात पिंडरूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले.”— (स्तोत्र १३९:१३–१६)
यिर्मया १:५ मध्ये देव म्हणतो, “मी तुला गर्भाशयात घडले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास, तू उदरातून निघण्यापूर्वी मी तुला पवित्र केले, मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा नेमले आहे.”,
येशूः गर्भधारणेच्या वेळी एक बाळ / न
जन्मलेल्या बाळांना मुले म्हणतात.
मत्तय १:२०-२१असे विचार त्याच्या मनात घोळत असता पाहा, प्रभूच्या
दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, “योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरीयेचा आपली पत्नी म्हणून
स्वीकार करण्यास अनमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ
आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे.तिला पुत्र होईल, आणि त्याचे
नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या
पापांपासून तारील.”
यावरून सूचित होते की, येशू निश्चितपणे गर्भधारणेच्या वेळी एक व्यक्ती होता.
३. “खून करू नकोस.” — देवाची आज्ञा
“खून
करू नकोस.” — (निर्गम २०:१३)
निर्गम २१:२२-२५ ही वचने गर्भाशयात शिशुच्या मृत्यूस कारण ठरणार्या व्यक्तीसाठी तोच दंड
— मृत्यू — ठरविते जो खून करणार्यासाठी दिला जातो. यावरून हे स्पष्टपणे दिसून येते
की देव गर्भाशयातील शिशुला मानव समजतो जसे पूर्ण वयात आलेल्या प्रौढास. ख्रिस्ती
व्यक्तीसाठी, गर्भपात ही मातापित्याच्या निवडीच्या हक्काची
बाब नाही. ती देवाच्या स्वरूपात घडविण्यात आलेल्या एका मानवप्राण्याच्या जीवन अथवा
मृत्यूची बाब आहे (उत्पत्ती १:२६-२७;
९:६).
गर्भपात
हे जीवन संपवण्याचे कृत्य आहे, म्हणजेच हत्या होय .देवाने
दिलेल्या पवित्र जीवनाचा अंत करणे हे त्याच्या आज्ञेविरुद्ध आहे. म्हणून गर्भपात
पाप आहे.
४. प्रत्येक मानवी जीव देवाच्या प्रतिमेत निर्माण झालेला आहे.
“देवाने मनुष्याला आपल्या प्रतिमेत
निर्माण केले.” — (उत्पत्ति १:२७)
गर्भातील जीव देखील देवाच्या प्रतिमेचे
प्रतिबिंब आहे. गर्भपात म्हणजे देवाच्या प्रतिमेवर आघात करणे.
देवाने निर्माण केलेल्या जीवनाचा अपमान करणे हा अपराध आहे.
५. गर्भपाताचे परिणाम
— शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक
गर्भपातानंतर शरीरावर परिणाम होतोच,
शिवाय मनात नैराश्य आणि अपराधीपणाची भावना निर्माण होतो. देवाशिवाय ही वेदना दूर होऊ शकत नाही.
म्हणूनच देवाकडे वळणे आणि त्याची क्षमा स्वीकारणे हेच खरे समाधान आहे.
६. देव क्षमाशील आहे.
“जर आपण आपले पाप कबूल केले, तर तो विश्वासू आणि न्यायी आहे आणि आपले पाप क्षमा करील.” — (१ योहान १:९)
ज्यांनी
गर्भपात करवून घेतला आहे, त्यांनी हे लक्षात ठेवावे की गर्भपाताचे पाप इतर कुठल्याही पापापेक्षा कमी
क्षम्य नाही. ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे, सर्व पापांची
क्षमा मिळू शकते . ज्या स्त्रीने गर्भपात करवून घेतला आहे,
किंवा ज्या
पुरुषाने गर्भपातास प्रोत्साहन दिले आहे, — ते सर्व येशू ख्रिस्ताठायी विश्वासाद्वारे
क्षमा प्राप्त करू शकता
७. देव म्हणतो — “जीवन निवडून घे ”
“मी तुझ्यासमोर जीवन आणि मृत्यू ठेवले आहे;
म्हणून जीवन निवडून घे .” — (अनुवाद ३०:१९)
देवाचा संदेश आजही तोच आहे — जीवन निवडून घे
. जीवन निवडणे म्हणजे देवाच्या बाजूने उभे राहणे. आपले कर्तव्य म्हणजे गर्भातील
जीवनाचे रक्षण करणे आणि समाजाला देवाचे सत्य सांगणे.
निष्कर्ष
बायबलनुसार गर्भपात चुकीचा आहे कारण:
गर्भपात देवाच्या जीवनदायी अधिकाराविरुद्ध
आहे.
गर्भपात “हत्या करू नकोस” या आज्ञेचे
उल्लंघन आहे.
गर्भपात देवाच्या प्रतिमेचा अपमान करतो.
गर्भपात देवाच्या योजनेत अडथळा आणतो.
तरीही, देव
क्षमाशील आहे आणि नव्या सुरुवातीची संधी देतो. चला आपण देवाच्या बाजूने उभे राहून
म्हणूया —
“प्रभु, आम्ही जीवन
निवडतो!”
धन्यवाद
#BibleTeaching #ChristianLife #AbortionInMarathi #BiblicalTruth #LifeIsGift #ProLife #ChristianFaith
.webp)