नाताळ म्हणजे काय ? What is Christmas
नाताळ म्हणजे काय ? What is Christmas
नाताळ-म्हणजे-काय-? What-is-Christmas
मानवी विचाराने आपण नाताळाचा अर्थ आपल्या सोयीनुसार हौस व इच्छा पूर्ण होईल अशा पद्धतीने लावतो, घर सजविणे व रंगरंगोटी किंवा चांगल्या खाद्य पदार्थाचा स्वाद घेणे . परंतु नाताळ म्हणजे, पापी मानवाच्या उध्दारासाठी ख्रिस्त येशूचा जन्म होय . मानवाच्या पापी स्वभावामुळे आज्ञाभंग करून सर्व मानवजात देवापासून दूर झालेली आहे. ती कायमचा दूर जावू नये म्हणून मानवाच्या उध्दारासाठी ख्रिस्त येशूचा जन्म ही दैवी योजना आहे. देव आपणास स्पष्टरित्या समजावा म्हणून परमेश्वराने प्रभू येशूच्या रुपात देह धारण केले. आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. त्याचा जन्म रक्त अगर देहाची इच्छा, अगर मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही तर पवित्र आत्माच्या योगे झाला. एवढेच नव्हे तर ,देव आम्हास स्पष्टरित्या समजावा व आम्हाला परमेश्वराबद्दल ज्ञानच नव्हे तर ओळख व्हावी म्हणूनच झाला.
प्रभू येशू कोण आहे ?
हा प्रश्न अनेकांनी आपआपल्या परी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतू तो प्रश्न काहींना स्पष्ट न झाल्यामुळे त्यांनी त्याला वेगळे वळन देवून म्हटले हा परप्रांतीयांचा देव आहे. काहींच्या मते तो ठराविक लोकांचाच देव आहे. ते त्यांचे अज्ञानपण किंवा बंडखोरपणा आहे. किंवा ते जमावांना खुश किंवा संतुष्ट करुन स्वतः नावलौकिक बनण्याचा प्रयत्न केला,
परंतु पवित्र शास्त्र बायबल सांगते प्रभू येशू सर्व मानवजातीचा देव आहे. त्याच्या समोर भाषा, कुळ, जात अस काही नाही, कारण देव पक्षपाती नाही. ज्यादेवाने जग व त्यातले अवघे निर्माण केले तो आकाशाचा व पृथ्वीचा प्रभू आहे. त्याच्याकडे सत्ता ,अधिकार आहे. तो अद्भूत मंत्री , समर्थदेव, सनातन पिता, शांतिचा अधिपती आहे व त्याची म्हणजे प्रभ येशू ख्रिस्ताची अशी इच्छा आहे की, सर्व मनुष्याचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या पूर्ण ज्ञानास पोहचावे . तो दहाने प्रगट झाला. आत्म्याने नितीमान ठरला. देवदूतांच्या दृष्टिस पडला. त्याची राष्ट्रात घोषणा झाली. जगात त्याजवर विश्वास ठेवण्यात आला. तो गौरवात वर घेतला गेला. प्रभू स्वतः आद्यदिव्य दूतांची वाणी व देवाच्या तूतारीचा आज्ञाध्वनी होत असता, स्वर्गातून उतरेल तेव्हा तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे वेतन देईल कारण तो अल्फा व ओमेगा, पहिला व शेवटला , प्रारंभ व शेवट असा आहे.
शेवटी मानव जातीचे काय होणार आहे ?
२ करिथ ५:१०, कारण आपणा सर्वांस ख्रिस्ताच्या न्यायासणासमोर खऱ्या स्वरुपाने प्रगट झाले पाहिजे यासाठी की प्रत्येकाला त्याने देहाने केलेल्या गोष्टींचे फळ मिळावे मग त्या बऱ्या असोत किंवा वाईट असोत,
यासाठी पवित्र शास्त्रात एक दाखला सांगितला आहे, मत्तय २५:३१-४६ जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या वैभवाने येईल व त्याच बरोबर सर्व देवदूत येतील तेव्हा तो आपल्या वैभवी राजासनावर बसेल त्याज पुढे सर्व राष्ट्रे जमविली जातील. आणि जसे मेंढपाळ शेरडा पासून मेंढरे वेगळे करीतो ,तसे तो त्यास एकमेकांपासून वेगळे करील . मेंढरास तो उजवीकडे ठेवील व शेरडास डावीकडे ठेवील तेव्हा तो आपल्या उजवीकडल्यास म्हणेल आहो पित्याचे आशिर्वादीत हो, या जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तूम्हा करिता सिद्ध केले ते वतन करुन घ्या. कारण मी भूकेला होतो. तेव्हा तूम्ही मला खावयास दिले. तान्हेला होतो तेव्हा मला प्यावयास दिले. परका होतो तेव्हा मला घरात घेतले. उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले आजारी होतो तेव्हा माझा समाचार घेतला. बंदी शाळेत होतो तेव्हा तुम्ही मजकडे आला. त्यावेळेस धार्मिक लोक त्याला उत्तर देतील की प्रभूजी आम्ही आपणाला केव्हा भूकेले पाहून खावयास दिले. केव्हा तान्हेले पाहून प्यावयास दिले. आपणास परके पाहुन केव्हा घरात घेतले. उघडे पाहुन केव्हा वस्त्र दिले. आणि आजारी अथवा बंदी शाळेत पाहुन केव्हा आम्ही आपणाकडे आलो. तेव्हा तो त्यास उत्तर देईल मी तुम्हास खचीत सांगतो की, ज्याअर्थी तुम्ही या माझ्या अति कनिष्ठ बंधुतील एकाला केले त्या अर्थी ते मलाच केले आहे. मग डावीकडल्यासही तो म्हणाला अहो शापग्रस्त हो सैतान व त्याचे दूत यासाठी जो सार्वकालीन अग्नी सिद्ध केला आहे. त्यात माझ्या पुढून जा. कारण मी भूकेला होतो. तेव्हा तूम्ही मला खावयास दिले नाही. तान्हेला होतो तेव्हा मला प्यावयास दिले नाही. परका होतो तेव्हा घरात घेतले नाही. उघडा होतो. तेव्हा मला वस्त्र दिले नाही. आजारी व बंदी शाळेत होतो तेव्हा माझा समाचार घेतला नाही. त्यावेळेस हेही त्याला उत्तर देतील प्रभूजी आम्ही केव्हा आपणाला भूकेले, तान्हेले, परके, उघडे, आजारी, किंवा बंदी शाळेत पाहून आपली सेवा केली नाही. तेव्हा तो त्यास उत्तर देईल मी तुम्हास खचीत सांगतो. तूम्ही ज्या अर्थी या अति कनिष्ठातील एकालाही केले नाही त्या अर्थी ते मला केले नाही. ते तर सार्वकालीक दंड भोगावयास जातील आणि धार्मिक लोक सार्वकालीक जीन भोगावयास जातील हे जर आज आपणास कळत आहे की नाताळ म्हणजे काय तो प्रभू येशूख्रिस्त कोण आहे आणि शेवटी तो मानव जातीचे काय करणार हे जर आपणास कळत आहे तर ही भिती न बाळगता त्या प्रभूची भक्ती, उपासना करुन त्याचा आदर करून आपल्या जीवनात त्याच्या चांगुलपणाचा अनुभव घेवु.
नाताळ बद्दल अधिक माहिती येथे क्लिक करा