Seven Last Words Of Jesus On The Cross
Seven Last Words Of Jesus On The Cross
वधस्तंभावरील येशूचे शेवटचे सात उद्गार
येशूच्या वधस्तंभावरील मरणाचे आणि त्याच्या पुनरुत्थानाचे चार वेगवेगळे वृत्तान्त चार शुभवर्तमानांत वाचायला मिळतात. त्यांत जो फरक आहे तो ह्यामुळे की, प्रत्येक लेखकाने त्या वेळच्या घटनांचे वर्णन आपआपल्या दृष्टिकोनातून केलेले आहे. ते चारही वृत्तान्त एकत्र केले तर एक समग्र वर्णन तयार होते.
वघस्तंभावरील यातना सहन करत असताना येशूच्या मुखातून सात उद्गार निघाले होते. त्यांना ‘सात शब्द’ असेही म्हणण्यात येते. ते खाली ज्या क्रमाने दिले आहेत त्या क्रमाने तो ते बोलला असावा असा तर्क केला जातोः
1st Words Of Jesus On The Cross
१) “बापा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करीत आहेत हे त्यांना ठाऊक नाही” (लूक २३;३४ ). ज्यांनी येशूला वधस्तंभावर खिळले होते, त्यांना जे काही ते करीत होते त्याविषयी पूर्णपणे कल्पना नव्हती कारण त्यांनी प्रभूयेशूला मशीहा म्हणून ओळखले नव्हते .याचा अर्थ असा नव्हे कि, त्यांना ईश्वरी सत्य समजले नाही म्हणून ते क्षमेस पात्र होते , परंतु या ठिकाणी प्रार्थना करण्याद्वारे निंदा करनार्यासाठीसुद्धा प्रभूयेशुची अमर्याद दैवी कृपा व्यक्त होते.
2nd Words Of Jesus On The Cross
२) लूक २३;४३ येशू त्याला म्हणाला, “मी तुला खचीत सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील.” या वचनात येशू वधस्तंभावर असलेल्या एका गुन्हेगारास आश्वासन देत आहे की, जेव्हा त्याचा मृत्यू होईल तेव्हा तो येशूबरोबर सुखलोकात असेल. कारण त्याच्या अगदी मृत्यूच्या वेळी, गुन्हेगाराने येशूवर विश्वास व्यक्त केला होता कारण त्याने ओळखले की तो कोण आहे .
लूक २३;४२. मग तो म्हणाला, “अहो येशू, आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा.
3rd Words Of Jesus On The Cross
३) “ योहान १९;२६ मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, “बाई, पाहा, हा तुझा मुलगा!”
जेव्हा येशूने त्याच्या आईला प्रेषित योहान याच्याबरोबर वधस्तंभाजवळ उभी असलेली बघितले , तेंव्हा त्याने त्याच्या आईची काळजी घेण्यासाठी ज्या योहानावर त्याची प्रीती होती त्याच्या हाती तिला दिले . आणि त्याच क्षणी प्रेषित योहान तिला आपल्या घरी घेऊन गेला योहान १९;२६,२७. या वचनात येशू एक दयाळू पुत्र या कर्तव्याने , काळजीने त्याच्या मृत्यूनंतर सुद्धा आईची देखभालीची व्यवस्था करत आहे .
4th Words Of Jesus On The Cross
४) मत्तय २७ ;४६ आपल्याला सांगते की सुमारे तीन वाजता येशू मोठ्याने ओरडून म्हणाला, “एलोई, एलोई, लमा सबखथनी ? ” ज्याचा अर्थ आहे, "माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास ?"
येथे, जेंव्हा देव येशुवर सर्व जगाची पापे लाधली असताना आपली त्याग करण्याची भावना व्यक्त करीत होता आणि म्हणूनच, येशूला देवापासून दूर जावे लागले. जेव्हा येशूला पापाचे वजन जाणवत होते तेव्हा तो अनंतकाळपर्यंत केवळ एकाच वेळेस देवापासून विभक्त होताना अनुभवत होता. स्तोत्र २२:१ मधील भविष्यसूचक विधानांचीही ही पूर्ती होती.
5th Words Of Jesus On The Cross
५ ) “येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून, ‘मला तहान लागली आहे,’ असे म्हटले. येशू येथे स्तोत्र ६९;२१ मधील मसिहा विषयीची भविष्यवाणी पूर्ण करीत होता. “त्यांनी मला अन्न म्हणून विष खायला दिले, तहान भागवण्यास मला आंब दिली.” मला तहान लागलेली आहे असे बोलून , त्याने रोमी पहारेकर्यास प्रेरित केले , जे वधस्तंभावर खिळण्याच्या वेळी देण्याची प्रथा होती आणि अशाप्रकारे त्याने ही भविष्यवाणी पूर्ण केली.
6th Words Of Jesus On The Cross
६ ) “पूर्ण झाले आहे,” असे म्हटले; आणि मस्तक लववून आपला आत्मा समर्पण केला. येशूच्या शेवटल्या शब्दाचा अर्थ असा होता की त्याचा त्रास संपला होता आणि त्याच्या पित्याने दिलेली सर्व कामे पूर्ण केले होते . ज्यात सुवार्ता करणे, आशर्यकार्य करणे आणि त्याच्या लोकांसाठी अनंतकाळचे तारण मिळवणे , ते पूर्ण झाले. पापाचे कर्ज फेडले गेले.
7th- Last Words Of Jesus On The Cross
७) लूक २३; ४६ तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, “हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो !” असे बोलून त्याने प्राण सोडला. येथे, येशू स्वेच्छेने पित्याच्या हाती आपला प्राण सोडत आहे, यावरून हे स्पष्ट होते की, त्याची मरणावर सत्ता आहे आहे, आणि तो बलिदान होत आहे - आणि देवाने त्याचे बलिदान स्वीकारले आहे.
तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंक अशा स्वतःस देवाला अर्पण केले. इब्री लोकांस ९;१४
या विषयावर अधिक सविस्तर अभ्यास साठी येथे क्लिक करा .
येथे क्लिक करा - ईस्टर म्हणजे काय ?
Nice information mf