What is the true Christmas? नाताळ माहिती मराठी , ख्रिसमसचा खरा अर्थ काय आहे ?

 

 नाताळ माहिती मराठी

What is the true Christmas?

ख्रिसमसचा खरा अर्थ काय आहे ? 

What-is-the-true-Christmas?,

 नाताळ माहिती मराठी

ख्रिसमसचा खरा अर्थ आहे प्रेम 

योहान ३:१६-१७ म्हणते, “कारण ,देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे”.

देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे, तर त्याच्या द्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले.

 नाताळ चा खरा अर्थ म्हणजे अदभूत प्रीतीचा उत्सव होय . 

खरा नाताळ [ ख्रिसमस] म्हणजे देवाने येशू ख्रिस्ताच्या व्यक्तीमत्वात मानवी रूप धारण केले . देवाने असे का केले ? कारण तो आपल्यावर प्रेम करतो! ख्रिसमस का आवश्यक होता ? कारण आम्हाला तारणार्याची गरज होती!

देव आपल्यावर इतके प्रेम का करतो? कारण तो स्वतः प्रेम आहे [१योहान ४:८]. आपण दरवर्षी ख्रिसमस का साजरा करतो? देवाने आपल्यासाठी जे केले त्याबद्दल कृतज्ञता म्हणून, आपण एकमेकांना भेटवस्तू देऊन, त्याची उपासना करून आणि विशेषतः गरीब आणि नाकारलेल्यांसाठी आपणहि आशीर्वाद व्हावे म्हणून .

ख्रिसमसचा खरा अर्थ “प्रेम” आहे. 

 देवाने त्याच्या स्वकियांवर प्रेम केले आणि त्याच्याबरोबर अनंतकाळ घालवण्याचा एकमेव मार्ग तयार केला. आपल्या पापांची शिक्षा भोगण्यासाठी त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. त्याने पूर्ण किंमत दिली आणि जेव्हा आपण तारणाची ती मोफत देणगी स्वीकारतो, तेव्हा आपण आपल्या पापाच्या दोषापासून मुक्त होतो.

पापाचा परिणाम

मनुष्याने आज्ञाभंग केल्यामुळे देवाशी त्याचा संपर्क कायमचा तुटला होता. आणि तो पुन्हा देवाशी आपआपल्या परीने जुडण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे . त्यासाठी त्याने अनेक मार्ग अवलंबले जसे कि , अन्नदान , पुण्यकर्म , यज्ञबली सामाजिक कार्य ई. हि सर्व कामे जरी आपणास चांगली दिसत असली तरी आपण या कामाद्वारे तारण किवां मोक्ष प्राप्त करू शकत नाही अथवा विकत घेऊ शकत नाही. कारण शास्र सांगते कि, 

 "आम्ही सगळे अशुद्ध मनुष्यासारखे झालो आहोत; आमची सर्व नीतीची कृत्ये घाणेरड्या वस्त्रांसारखी झाली आहेत; आम्ही सर्व पाल्याप्रमाणे वाळून गेलो आहोत; आमच्या अधर्माने आम्हांला वादळाप्रमाणे उडवून दिले आहे." [यशया ६४;६ ]

होय, सर्व मानवजात पापात जीवन जगात आहे . आज मनुष्याची समस्या पाप आहे. कारण शास्र सांगते

"सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत." रोम ३;२३

            "पापाचे वेतन मरण आहे." रोम ६:२३

परंतु चांगली बातमी हि आहे कि ,

देव तुमच्यावर प्रेम करतो आणि तुमच्या जीवनासाठी त्याच्याकडे  अद्भुत योजना आहे . त्याची इच्छा आहे कि, प्रत्येक मानवाला तारण अथवा मोक्ष प्राप्त व्हावे . त्याचे आमंत्रण स्वीकारणाऱ्या सर्वांसाठी तारण अथवा मोक्ष फुकट आहे. त्याचे आमंत्रण सर्व जगासाठी खुले आहे. 

What-is-the-true-Christmas?,

",देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. " योहान ३:१६ 

    "परंतु देव आपल्यावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला." रोम ५;८

“शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या-आमच्या पापांबद्दल मरण पावला; तो पुरला गेला; शास्त्राप्रमाणे तिसर्‍या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले; आणि तो केफाला, मग बारा जणांना दिसला.त्यानंतर तो एकदम पाचशेपेक्षा अधिक बंधूंना दिसला.” [१करिंथ ५;३-६] 

येशूच देवाकडे जाण्याचा मार्ग आहे.

"येशूने त्याला म्हटले, “मार्ग, सत्य व जीवन मीच आहे; माझ्या द्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही." योहान १४;६

जेंव्हा तुम्ही येशू ख्रिस्ताला तारणारा आणि प्रभु म्हणून स्विकारता तेव्हा तो तुम्हास त्याच्या कुटुंबात दत्तक करुन घेतो.

"परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणार्‍यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला." [योहान १;१२ ]

 तारण ही त्याची मोफत देणगी आहे.

 पश्चात्ताप आणि विश्वासाद्वारे आपणास ख्रिस्तामध्ये तारण प्राप्त होते. याचा अर्थ पापी मार्गांपासून वळून पश्चात्तापपूर्वक ख्रिस्तावर विश्वास ठेवणे. येशू तुमच्या पापांची क्षमा करेल व तुम्हाला जीवनाचा मार्ग दाखवेल. कोणीही हे जीवन स्वताच्या प्रयत्नाने प्राप्त करू शकत नाही, ही त्याची मोफत देणगी आहे.

"कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे; कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही." [इफीस २;८,९]

पुढील प्रार्थनेद्वारे हे तारण आपण प्राप्त करू शकता .

प्रिय प्रभु येशू, मला माहित आहे की, मी पापी आहे या क्षणी मी तुझजवळ पश्चातापपूर्वक  माझ्या अपराधांची क्षमा मागतो. माझा विश्वास आहे की तू माझ्या पापांसाठी मेला आणि मेलेल्यांतून उठला. मी माझ्या पापांपासून वळतो आणि तुम्हाला माझ्या हृदयात आणि जीवनात येण्यासाठी आमंत्रित करतो. मी माझा प्रभु आणि तारणारा म्हणून तुझा स्वीकार करतो .

अधिक नाताळाच्या  माहिती करिता येथे  क्लिक करा

जर आपण हा संदेश वाचून आशीर्वादित झाला असाल तर जरूरआपल्या प्रियजनांना पाठवा .🙏🙏🙏

 प्रभू येशू चे संपूर्ण जीवनचरित्र बघण्यासाठी खालील व्हिडीओवर क्लिक करा 

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url