The Lord's Supper प्रभु भोजन
प्रभु
भोजन
The Lord's Supper
|
|
ख्रिस्ताने
गेथशेमाने बागेत जाण्याअगोदर एकदाच शिष्यांबरोबर हा विधी पाळला होता.
प्रभुभोजन
म्हणजे काय ?
येश
खिस्ताने त्याच्या मृत्युच्या आदल्या दिवशी प्रभुभोजन किंवा सहभागितेचा विधी प्रथम
संस्कारित केला. वल्हांडणाच्या सणाचे ते वल्हांडणाचे भोजन होते. येशूच्या जीवनातील
तो शेवटचा आठवडा होता. देवाने यहूदी लोकांना, त्यांची मिसरातील दास्यातून सुटका झाली याच्या स्मरणार्थ
वल्हांडणाचा सण दरवर्षी पाळावा अशी आज्ञा केली होती निर्गम 12:1-20. त्या
भोजनासाठी बेखमीर भाकर खावी अशी देवाने आज्ञा केली होती. 1 करिंथ 5.7
मध्ये पौल म्हणतो की येशू खिस्त हा
आपल्यासाठी वल्हांडणाचा यज्ञ ठरला. म्हणून वल्हांडण सणाच्या ऐवजी, खिस्ती लोक प्रभुभोजन विधी पाळतात .
१. प्रभुभोजनाच्या विधीचा हेतू
पापांची
क्षमा व्हावी म्हणून आपण प्रभुभोजन घेत नाही. ह्या विधीमध्ये क्षमा देण्याचे
सामर्थ्य नाही.
- येशूच्या आज्ञेप्रमाणे आम्ही प्रभुभोजन घेतो (आभार मानून ती मोडली, आणि म्हटले, “[घ्या, खा,]हे माझे शरीर तुमच्यासाठी [मोडलेले असे] आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा.”१करिंथ.११:२४.)
- त्याच्या परत येण्याच्या अपेक्षेने आम्ही ते घेतो, (कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. १करिंथ.११:२६).
- प्रभूच्या मरणाची घोषणा करण्यासाठी आम्ही ते घेतो, १करिंथ.११:२६.
आम्ही
लायक आहो म्हणून कोणी प्रभुभोजन घेत नाही. आमचा देवाच्या कुटुंबात जन्म झाला ही
केवळ त्याचीच कृपा आहे. त्याच्या मेजाजवळ कोणीही गर्विष्ठ अंतःकरणाने बसत नाही
मेजाजवळ येण्यामध्ये आम्ही खरोखर देवाची मुले असू, तर सहभागितेसाठी व सामर्थ्यासाठी आम्ही धैर्याने त्याच्या
मेजाजवळ येऊ.
प्रेमळ स्वर्गीय पित्याच्या मेजाजवळून आम्ही भीतीने मागे जाऊ
नये. तो आम्हांला मेजाजवळ येण्यासाठी बोलावतो आणि त्याला आमच्या सहभागितेच्या
आनंदापासून वंचित न ठेवणे हे आमचे कर्तव्य आहे.
|
|
- ज्यांचा देवाच्या कुटुंबात जन्म झाला आहे, त्यांना प्रभूच्या सहभागितेत त्याच्या मेजाजवळ बसण्याचा हक्क आहे.
- अविश्वासू आणि देहस्वभावी व्यक्तीचा संबंध “भुतांच्या मेजाशी” आहे. (१करिंथ. १०:२१ तुमच्याने प्रभूचा प्याला व भुतांचाही प्याला पिववत नाही; ‘प्रभूच्या मेजावरचे’ व भुतांच्याही मेजावरचे तुमच्याने खाववत नाही ).
- बाप्तिस्मा झालेल्या विश्वासणाऱ्या व्यक्तीच त्या विधीत सहभागी होऊ शकतात असा काही मंडळ्या नियम करतात.
बहुतेक
सुवार्ताप्रसारी मंडळ्या इतर सुवार्ताप्रसारी मंडळ्यांतील बंधूंना उपासनेस हजर
राहण्यास व प्रभुभोजन घेण्यास उत्तेजन देतात. काही शिस्तप्रिय मंडळ्या फक्त
त्यांच्या मंडळीतील सभासदांनाच प्रभुभोजन देतात. शिस्तीसाठी ज्या सभासदांना
प्रभूच्या मेजापासून दूर ठेवले आहे त्यांनी योग्य वेळ येईपर्यंत त्यांच्या किंवा
दुसऱ्या चर्चमध्ये त्या विधीमध्ये भाग घेण्यापासन स्वताला आवरावे.
३.
प्रभुभोजन घेण्याअगोदर आत्मपरीक्षण करणे महत्त्वाचे आहे.
|
|
- १ करिंथ.११:२८- म्हणून माणसाने आत्मपरीक्षण करावे व मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे.
- २ करिथ. १३:५- तुम्ही विश्वासात आहा किवा नाही ह्याविषयी आपली परीक्षा करा ; आपली प्रतीती पाहा (स्तोत्र.२६:२; १३९:२३).
विश्वासाणार्याने
अशी प्रार्थना करावी,
“हे प्रभू, तुझ्या वचनाचा प्रकाश माझ्यावर पाड.” आत्मपरीक्षण करणे म्हणजे चिकित्सकपणे , काळजीपूर्वक निरीक्षण करणे,
शोधणे, तपासणे.
१)
मी कोणाचे परीक्षण करायचे ?
उपदेशकाचे...? नाही , माझे स्वतःचे.
२)
आम्ही स्वतःचे परीक्षण का करावे?
अ) कारण शास्त्रवचनांमध्ये तशी स्पष्ट आज्ञा आहे.
ब) अयोग्य रीतीने खाण्यामुळे न्याय, अशक्तपणा, आजार, अकाली मृत्यू ओढवतो ह्या परीक्षणामुळे पाप शोधून
पश्चात्तापपूर्वक ते दूर केले जावे.
३)
मी स्वतःचे आत्मपरीक्षण कसे करावे ? स्वतःला समर्पक प्रश्न विचारून.
१.
मी येशू ख्रिस्तावर खरोखर प्रामाणिकपणे
विश्वास ठेवतो का? (
प्रेषित १६; ३१
“प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या
घराण्याचे तारण होईल.”) .
२.
देवाच्या कुटुंबात माझा खरेच नव्याने जन्म झाला आहे का ? ( योहान.३:३-७
“मी तुम्हांला खचीत सांगतो, नव्याने जन्मल्यावाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही.”)
३.
माझ्या जीवनात एखादे कबूल न केलेले पाप आहे का ? गर्व?
लोभीपणा? आळशीपणा? अवज्ञा? पापाची आवड ? जगाची आवड माझे वैचारिक जीवन शुद्ध आहे का? मी सतत ख्रिस्तासाठी साक्ष दिली आहे का? शास्त्रवाचनात व प्रार्थनेबाबत मी विश्वासू आहे का? इतरांसाठी प्रार्थना करायचे वचन मी पाळले आहे का?
४.
माझ्या पापांबद्दल मी मनापासून
पश्चात्ताप केला का? पश्चात्तापाशिवाय कबुली ही कुचेष्टा आहे.
५.
मी अधिक पवित्र जीवन जगायचे अंतःकरणात
वचन देतो का?
६.
मी माझ्या सर्व मनाने,शक्तीने, अंतःकरणाने आणि
बुद्धीने देवावर प्रीती करतो का? (लूक
१०:२७ “तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण शक्तीने व संपूर्ण बुद्धीने ‘प्रीती कर;’ आणि ‘जशी आपणावर तशी आपल्या शेजार्यावर प्रीती कर.” )
७.
मी स्वतःप्रमाणेच माझ्या शेजाऱ्यावर
प्रीती करतो का? लूक. १०:२७
८.
जे माझ्याविरुद्ध वागले आहेत त्यांना मी
क्षमा केली आहे का? ( मत्तय.६:१४, १५; ५:२३,२४. जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या
अपराधांची क्षमा करणार नाही.
)
९.
वैयक्तिकरित्या ख्रिस्ताने ज्या आज्ञा
मला दिल्या त्यांचे पालन मी करतो का? उपदेश देण्याविषयी? गाणे गाण्याविषयी? गरीबांना देण्याविषयी? संडेस्कूलमध्ये शिकवण्याविषयी?
१०. ह्या प्रभुभोजनासाठी
तयारी करीत असताना मी प्रामाणिक आहे का ?
४. प्रभूभोजन घेण्याची वेळ
नवीन करार प्रभूभोजन घेण्याबाबत विशिष्ट
वेळापत्रक देत नाही . पहिल्या मंडळीने प्रभूभोजन हे वारंवार घेतले (प्रेषित २;४२-४८ ). त्रोवासच्या मंडळीने
आठवड्याच्या पहिल्या दिवशी घेतले. (प्रेषित२०;७ )
बरच्याशा मंडळ्या महिन्यातून एकदा , काही दर
तीन महिन्यांनी एकदा, काही वर्षामध्ये एकदा,
काही फक्त विशेष पवित्र दिवसांवर किंवा
जेव्हा जेव्हा त्यांना आवडेल तेव्हा प्रभूभोजन घेतात . इतर काही गट आठवड्याच्या
पहिल्या दिवशी प्रभूभोजन घेतात.
५
. प्रभुभोजनासाठी आवश्यक असलेल्या बाबी
भाकर
आणि द्राक्षारस हे दोनच पदार्थ शरीर व रक्त यांचे प्रतीक म्हणून वापरतात. या
पदार्थांचे परिवर्तन होते अथवा यात ख्रिस्ताच्या शरीराचे व रक्ताचे अस्तित्व आह
असे पवित्रशास्र शिकवत नाही, परंतु हे घटक घटकच
राहतात. ते केवळ प्रतीके आहेत. या घटकांमध्ये गूढ बदल किंवा शक्ती आहे असे नाही.
भाकर
बेखमीर आहे. त्याद्वारे पाप दूर केले आहे असे सूचित होते. याद्वारे आम्ही पुढे शुद्ध व पवित्र जीवन जगायचे आहे, हे समजून घेतो.
६
. परिणाम
आत्मपरीक्षाणाद्वारे
विश्वासणारा शुद्ध व स्वच्छ होतो आणि येशूच्या रक्ताने केवळ पाप दूर व्हावे असे
नाही,तर पाप करण्याची इच्छाही दूर व्हावी अशी अपेक्षा करतो.
विश्वासणाऱ्याला
प्रभूच्या व इतर विश्वासणाऱ्यांच्या सहभागितेमळे सामर्थ्य प्राप्त होते.
ख्रिस्ताच्या मरणावर व त्याच्या परत येण्यावर चिंतन केल्याने विश्वासणाऱ्यामध्य
सुधारणा होते.
हे शिक्षण आपल्या इतर प्रियजनासहि मिळावे याकरितां कृपाकरून पुढे पाठवा .
आणि पुढील शिक्षण प्राप्त करण्याकरीता follow या लिंकवर क्लिक करा.
देवबाप आपणास अधिक आशीर्वादित करो.