Temptations मोह

मोह Temptations
what-is-temptations
temptations



    सर्व विश्वासणाऱ्यांना मोह होतो. एदेन बागेत सैतानाने पहिल्या पुरुषाला व स्त्रीला मोह घातला आणि तेव्हापासून हा अनुभव सर्वांना येतो...

१ करिंथ. १०:१३ - मनुष्याला सहन करिता येत नाही अशी परीक्षा तुम्हांवर गुदरली नाही.

मोह किंवा परीक्षा येणे म्हणजे पाप नाही.मोहात पडणे हेच पाप आहे. विश्वासणाऱ्याला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने व साहाय्याने विश्वासात टिकता येते. याकोब.१:१२ - जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण आपणांवर प्रीति करणाऱ्यांना प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुगूट,परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल.

मोह कोठून व कसा येतो ?

१. मोह देवाकडून नाही

याकोब. १:१३ - कोणाची परीक्षा होत असता, देवाने मला मोहात घातले, असे त्याने म्हणू नये, कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहात पाडीत नाही.

देवाने सैतानाला ईयोबाची परीक्षा पाहण्याची परवानगी दिली. त्याने त्या परीक्षेला मर्यादा घातली.

ईयोब १:१२ - परमेश्वर सैतानास म्हणाला,पाहा, त्याचे सर्वस्व तुझ्या हाती देतो; त्याला मात्र हात लावू नको.

ईयोब २:६ - परमेश्वर सैतानाला म्हणाला, पाहा, तो तुझ्या हाती आहे, त्याची प्राणहानि मात्र करू नको.

2. मोह सैतानाकडून येतो.

how-to-overcome-over-temptations
temptations

सैतानाने एदेन बागेत हव्वेला भुरळ घातली. त्याने प्रभू येशू ख्रिस्ताचीही परीक्षा पाहिली.

मत्तय ४;१ तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी ....

त्याने एकदाच प्रभ येशूची परीक्षा पाहिली असे नाही. त्याने देवपित्याची इच्छा पूर्ण करू नये  असा प्रयत्न सैतान करीत राहिला.

लुक ४;१३ मग सैतान सर्व परीक्षा संपवून संधि मिळेपर्यंत त्याला सोडून गेला.

३. मोह देहापासून येतो

याकोब १:१४ - तर प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलविला जातो तेव्हा मोहात पडतो.

पतानाचा परिणाम मनुष्याचे शरीर, भावना,मनोवृत्ती या सर्वांवर झाला. यांच्याद्वारे सैतान त्याला मोहात पाडतो.

योहान. २:१६ - कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी ही पित्यापासून नाहीत; तर जगापासून आहेत.

४. मोह इतर पाप्यांकडून येतो.

नीति.१:१० - माझ्या मुला,पापी जन तुला भुलथाप देतील तर तिला वश होऊ नको. ज्यांच्याकडून मोह होईल त्यांच्याबरोबर विश्वासणाऱ्याने मैत्री करू नये.

 नीति.४:१४ - दुर्जनांच्या मार्गात शिरू नको; दुष्टांच्या मार्गाने चालू नको.

५. मोह विश्वासणाऱ्यांकडूनसुद्धा येतो.  मत्तय. १६:२२,२३ - तेव्हा पेत्र त्याला जवळ घेऊन त्याचा निषेध करून म्हणाला, प्रभुजी आपणांवर दया असो, असे आपल्याला होणारच नाही. परंतु तो वळून पेत्राला म्हणाला, अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा. तू मला अडखळण आहेस; कारण देवाच्या गोष्टींकडे तुझे लक्ष नाही. माणसांच्या गोष्टींकडे आहे.

कोणीच परिपूर्ण नाही. आपण इतरांना मोहात पाडू नये अशी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. आंधळे बनून आपण इतरांच्या सांगण्याप्रमाणे करू नये. विश्वासणाऱ्यांनी दिलेला सल्ला किंवा मार्गदर्शन नेहमीच बरोबर असते असे नाही. अनेक गोष्टींद्वारे आपल्याला मोह हातो. उदा. गरिबी, भरभराट, जगिक वाहवा, निराशा, अपयश. आपण कोणती पुस्तके वाचतो, टी.व्ही. वर काय पाहतो. ऐकतो, यांविषयी आपण सावध असावे. प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्याला साहाय्य करतो.

इब्री ४:१५ - कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूति वाटत नाही असा प्रमुख याजक नाही. तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता; तरी निष्पाप राहिला.

आपल्या सहनशक्तीपलीकडे देव आपली परीक्षा होऊ देत नाही. १करिंथ १०:१३ - तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही करील, ह्यासाठी की तुम्ही ती करावयास समर्थ व्हावे. विश्वासणारा मोहावर विजयी होऊ शकतो. देवाने आपल्याला अभिवचन दिले आहे.

प्रकटी. ३:१० - धीराविषयीचे माझे वचन तू राखले आहे म्हणून पृथ्वीवर राहाणाऱ्या लोकांची परीक्षा होण्याचा जो परीक्षाप्रसंग सर्व जगावर येणार आहे, त्यापासूनही मी तुला राखीन.

विश्वासणारा मोहावर कसा विजयी होतो?


१. देवाच्या वचनाने

सैतानाने प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा पाहिली तेव्हा प्रत्येक वेळी ख्रिस्ताने देवाचे वचन ऐकविले (मत्तय.४:४,,१०).

२. प्रार्थनेने  

प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी प्रार्थना करतो. आपणही प्रार्थना करावी.

लूक.२२:३१,३२ - शिमोना, पाहा, तुम्हांस गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने मागणी केली. परंतु तुझा विश्वास ढळू नये म्हणून तुझ्यासाठी मी विनंती केली आहे.

मत्तय.२६:४१ - तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा.

 ३. दूर पळण्याने


२ तीमथ्य.२:२२ - तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ आणि शुद्ध मनाने प्रभूचा धावा करणाऱ्याबरोबर नीतिमत्त्व, विश्वास,प्रीति,शांती यांच्या पाठीस लाग.

आपल्याला मोह उत्पन्न होईल अशा ठिकाणी आपण जाऊ नये,गेल्यास तेथे थांबू नये.

४. विरोध करण्याने
Temptations
flee-from-temptations

याकोब. ४:७ - सैतानाला आडवा म्हणजे तो तुम्हांपासून पळून जाईल.पापात पडू नये म्हणून आपण प्रार्थनेत असावे. पवित्र आत्म्याचे साहाय्य मागणे, देवाचे वचन वाचणे या गोष्टींद्वारे विजयी होणे शक्य आहे. या गोष्टींकडे दुर्लक्ष केले, तर आपण आत्मिक दृष्ट्या अशक्त होतो. दुबळा मनुष्य कधी विजयी होत नाही. मोहाप्रमाणे वागणे म्हणजे पाप करणे. मानवाच्या अशक्तपणामुळे तो मोहात पडून पाप करतो. अशा रीतीने तो देवापासन दर जातो. पाप केले तर आपण ताबडतोब देवाजवळ पापांची कबुली द्यावी,पश्चात्ताप करावा आणि क्षमा मागावी.

१ योहान. १:९ - जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे. म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील. पापांची क्षमा झाल्यावर आपण ते पाप सोडून द्यावे आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करावा.

देव आपल्याला अंतर देत नाही.

होशेय १४:४- मी त्यांना वाटेवर आणीन त्यांच्यावर मोकळ्या मनाने प्रीती करीन, कारण त्यांच्यावरचा माझा राग गेला आहे.

आपल्या जीवनात मोह येणारच. तथापि देवाने दिलेली साधने (पवित्र शास्त्र, प्रार्थना) वापरून पापावर विजयी होण्याचा प्रयत्न करीत राहावा.

प्रकटीकरण २ ;१०,११  पाहा, तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान...विश्वासु राहा म्हणजे मी "जीवनाचा मुगूट देईन...जो विजय मिळवितो त्याला दुसऱ्या मरणाची बाधा होणारच नाही.

 

कृपया इतरानाही हा उपदेश पाठवा . तसेच आपल्या प्रतिक्रिया लिहा .

 

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url