स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट असा ठरला ,15th August independence day in marathi

 

 स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट असा ठरला.

15th August independence day in marathi
15th August independence day in marathi


 असा ठरला स्वातंत्र्यदिन 15-August 26

    माऊंटबॅटन यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. या वेळी परदेशातील तीनशेहून अधिक पत्रकार हजर होते. सुरवातीला माऊंटबॅटन यांनी निवेदन केले. त्यानंतर एका भारतीय पत्रकाराने त्यांना विचारले, की आतापासून सत्तेचे हस्तांतर होईपर्यंत अत्यंत वेगाने काम करावे लागेल हे सर्वांनी जर मान्य केले असेल, तर हस्तांतरासाठी कुठली तारीख आपण निश्‍चित केली आहे का? त्यावर माऊंटबॅटन यांनी उत्तर दिले, 


 स्वातंत्र्यदिन 15 ऑगस्ट   15th August independence day .

        भारतात स्वातंत्र्याची चळवळ 1942 नंतर जोरदारपणे सुरू होती. त्यामुळे देश सोडून जाण्यासाठी ब्रिटिश सत्तेवर दबाव वाढत होता; तर दुसरीकडे स्वतंत्र पाकिस्तानची मागणीही जोर धरू लागली होती. फेब्रुवारी 1947 मध्ये ब्रिटनचे पंतप्रधान क्‍लेमंट ऍटली यांनी भारताला उशिरात उशिरा म्हणजे जून 1948 पर्यंत स्वातंत्र्य देण्यात येईल असे जाहीर केले; पण त्या अशांत परिस्थितीत ठरलेल्या मुदतीआधीच भारताला स्वातंत्र्य देण्याची योजना प्रत्यक्षात आली.

    व्हाइसरॉयपदी लॉर्ड माऊंटबॅटन आले. त्यानंतर अल्पावधीतच माऊंटबॅटन यांनी मतमतांतरात भरकटू शकणारे उपखंडाचे जहाज स्वातंत्र्याच्या दिशेने मार्गस्थ केले. आधी ब्रिटनमधील सरकारचा आपल्या योजनेला होकार मिळवला. जून 1947 च्या सुरवातीला त्यांनी फाळणीची योजना भारतीय नेत्यांपुढे ठेवली. त्यावर त्यांची संमती घेण्यात यश मिळवले. त्यानंतर महात्मा गांधी यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. स्वातंत्र्याची तारीख कशी जाहीर झाली, त्या प्रसंगाचे डॉमनिक लॅपीए आणि लॅरी कॉलिन्स यांनी आपल्या "फ्रीडम ऍट मिडनाईट‘ या ग्रंथात वर्णन केले आहे, ते मुळातून वाचण्यासारखे आहे. त्यानुसार झाले ते असे- माऊंटबॅटन यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. खूप महत्त्वाची पत्रकार परिषद असल्याने अनेक देशांतून तीनशेवर पत्रकार हजर होते. सुरवातीला माऊंटबॅटन यांनी निवेदन केले. त्यानंतर प्रश्‍नोत्तरे सुरू झाली. या प्रश्‍नोत्तर सत्राच्या अखेरीस एका भारतीय पत्रकाराने त्यांना विचारले, की आतापासून सत्तेचे हस्तांतर होईपर्यंत अत्यंत वेगाने काम करावे लागेल हे सर्वांनी जर मान्य केले असेल, तर हस्तांतरासाठी कुठली तारीख आपण निश्‍चित केली आहे का? त्यावर माऊंटबॅटन यांनी होकारार्थी उत्तर दिले.

स्वातंत्र्य दिन माहिती

साहजिकच प्रश्‍नकर्त्याने विचारले, की ती कोणती तारीख आहे? त्यावर माऊंटबॅटन यांनी सांगितले, की "15 ऑगस्ट" 1947 15th August रोजी भारतीयांकडे सत्तेचे अंतिम हस्तांतर केले जाईल. ही हकिगत लिहून ग्रंथकर्ते म्हणतात, की दिल्लीतील माऊंटबॅटन यांचे निकटवर्ती किंवा त्यांच्याशी तासन्‌तास चर्चा करणारे भारतीय नेते यांच्यापैकी कुणाशीही माऊंटबॅटन यांनी या तारखेविषयी चर्चा केली नव्हती, तिचा कधी उल्लेखही झाला नव्हता. अशी भारतीय स्वातंत्र्याच्या तारखेची ही हकिगत. पत्रकार परिषदेत एका प्रश्‍नाच्या उत्तरातून भारताच्या स्वातंत्र्याची तारीख अशा रीतीने जगापुढे आली. त्यानंतर सत्तेच्या हस्तांतराची प्रक्रिया वेगात सुरू झाली आणि तीन महिन्यांपेक्षाही कमी काळात त्याच तारखेला भारत आणि पाकिस्तान हे दोन देश फाळणीच्या वेदना सोसत स्वतंत्र झाले. 14 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्रीनंतर म्हणजे 15 ऑगस्ट 1947 ला दिल्लीत झालेल्या समारंभात भारताची सत्ता भारतीय नेत्यांच्या हाती सोपविण्यात आली. स्वातंत्र्याच्या त्या पहाटे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी भाषण केले. "नियतीशी करार‘ या नावाने हे भाषण इतिहासात प्रसिद्ध आहे.

 

 स्वातंत्र्य दिन माहिती मराठी 

भारताला स्वातंत्र्य मिळून  ८० वर्ष झालीस्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिकारी, स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. स्वराज्य मिळवण्यासाठी टिळक, गांधी, पटेल, सुभाषचंद्र बोस या महापुरुषांच्या नेतृत्वाखाली अनेक जण स्वातंत्र्याच्या लढाईत धारातीर्थी पडले, देशासाठी आपलं बलिदान दिलं. स्वराज्याचं स्वप्न अखेर '15th August independence day' १५ ऑगस्ट १९४७  साली सत्यात उतरलं. ब्रिटिश राजवटीतून भारत स्वतंत्र झाला.

     “At the stoke of the midnight hour, when the world sleep, India will awake to life and freedom. A moment comes but rearly in history, when we step out from old to the new…. India discovers herself again. Pandit Nehru.”

 

      15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन  

     स्वातंत्र्य दिनाच्या पुर्व संध्येला पंडित नेहरुंनी दिलेल्या या भाषणात भारताने स्वातंत्र्यासाठी केलेला संघर्षमयी प्रवास उलगडला आणि त्याबरोबरच भारताने आपलं स्वातंत्र्य परत मिळवल्याचं जगाला सागितलं. भारत जगतील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून ओळखले जाते. भारतात असलेल्या सांस्कृतिक तसेच धार्मिक विविधतेमुळे भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा अनेकांनी भारत हा देश एकसंध राहणार नाही असे भाकित वर्तवले होते. परंतू विविधतेत एकता हेच भारताचे वैशिष्ठय ठरले आणि आज ८० वर्षाच्या स्वातंत्र्यतोत्तर वाटचालीत भारताच्या एकात्मतेला कुठेही तडे गेले नाहीत. (अपवाद काही धार्मिक संघटना) भारताने तंत्रज्ञान, विज्ञान, शेती, शिक्षण असा विविध क्षेत्रात प्रगती केली. आज भारताकडे स्व:ताचा आण्विक साठा आहे. भारत माहासत्तेच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं म्हटलं जातयं.

     भारत ज्या वेगाने प्रगती करत आहे त्या किबंहुना त्याच्या दुप्पट वेगाने भारत विविध समस्यांनी वेढला गेला आहे. प्रश्न पडतो की खरच आपण स्वतंत्र आहोत का? ब्रिटिश राजवटितून आपण कधिच मुक्त झालो. पण महागाई, दहशतवाद, भ्रष्टाचार, स्वैराचार, यात मात्र अडकलो आणि यातून दिवसेंदिवस बाहेर पडणं कठीण होत चाललयं. परदेशियांशी लढणं सोपं आहे पण स्वकियांशी तितकच कठीण.

     आपल्याला महान आणि तडफदार नेते, राजकारण्यांचा इतिहास आहे. पण खेद याचा वाटतो की, या इतिहासाची पुनारावृत्ति होत नाहिये. आज आपल्या देशात भ्रष्टाचार एवढा होत आहे की आणखी काही दिवसांनी तो एक शिष्टाचार होतो की काय अशी भिती निर्माण झाली आहेत. स्टॅम्प पेपरपासून ते चारा घोटाळा या सारख्या अनेक घोट्याळ्यात माननीय मंत्री अडकलेले आहेत. हे कमी कि, काय मंत्री महोदयांनी राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात घालून आपली घोटाळ्यांची परंपरा चालू ठेवली आणि बोफोर्स आणि मिग २१ विमान खरेदी पर्यंत मजल मारली ही अत्यंत शरमेची बाब आहे. घोट्याळ्यांची व्यापकता आणि विविधता राखण्यात मात्र त्यांनी सातत्य राखलं. राष्ट्रपिता गांधीजींच्या अहिंसेच्या चळवळीपुढे ब्रिटिशांनाही झूकावं लागलं. गांधीजींच्या तत्वज्ञानाचा जगभरात आजही पुरस्कार केला जातो. महागाई, भ्रष्टाचार, दहशतवाद यांची झळ बसणारा सामान्य माणूस बोथट झाला आहे. किती आणि कोणाला प्रतिकार करणार म्हणून एकतर सहन करणं नाहितर विसरणं असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. याशिवाय ते जगूच शकत नाही. नुकतेच पुण्यात झालेले स्फोट त्यांनतर सी.एस.टी वर झालेला हिंसाचार ही याची ताजी उदाहरणं आहेत. देशातल्या जनेतेच्या सहनशक्तीला खरच दाद दयायला हवी. आपल्या देशातल्या राजकारण्यांना जनतेचे प्रश्न सोडवण्यापेक्षा ते तेवत ठेवणं सोयिस्कर वाटतं. एवढंच नव्हे तर थेट परदेशी मासिकाने आपल्या नेत्यांना राज्यकारभारात नापास करावं, केवढी नामुष्की.

     आर्थिक महासत्तेची स्वप्न बघणारया भारतात दारिद्रय रेषेखालील जनेतेला अन्न, निवारा या जीवनाश्यक गोष्टीची भ्रांत आहे. आपल्या तिरंग्यातील तीन रंग शांतता, सामर्थ्य, सुबत्ता याचे प्रतिक आहेत. हिरवा सुबत्तेचं, भगवा सामर्थ्याचं आणि पाढंरा शांततेचं. आज तिरंगा फडकवताना मनात येतं की खरचं भारतात शांती आहे? महासत्ता बनण्याचे सामर्थ्य आहे? शेतकरयांच्या आत्महत्या होणारया कृषीप्रधान भारतात सुबत्ता आहे? आज स्वातंत्र्य दिन नागरिकांसाठी बॅंक हॉलिडे झाला आहे.

     या दिवशी ड्राय डे असुनही पर्यटन स्थळी मदयपींना आवर घालण्यासाठी पोलिस बंदोबस्तात वाढ करावी लागते. खरच स्वातंत्र्याची किंमत कधी कळणार आपल्याला.’जहा डाल डाल पे सोने की चिडिया करती है बसेरा वो भारत देश है मेरा’ या ओळी प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पुन्हा एकदा क्रांती घडणं आवश्यक आहे तरच आपलं महासत्ता बनण्याचं स्वप्न साकार होईल.


Indian Christian Freedom Fighters



Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url