Mary's Intercession and Worship: What Does the Bible Really Teach?

मरीयेची मध्यस्थी आणि उपासना: बायबलची स्पष्ट शिकवण
Mary's Intercession and Worship: What Does the Bible Really Teach?

Mary's Intercession and Worship
Mary's Intercession and Worship: What Does the Bible Really Teach?


ख्रिस्ती विश्वासामध्ये आराधना ही केवळ परमेश्वरासाठी राखून ठेवलेली आहे. मरीया यांच्याविषयी विविध शिकवणी आणि परंपरा प्रचलित आहेत. परंतु बायबल या विषयावर नेमके काय शिकवते? मरीयेची मध्यस्थी, उपासना, कृपा, तारण आणि येशू ख्रिस्ताचे स्थान याविषयी पवित्र शास्त्र काय सांगते, हे आपण या लेखात पाहणार आहोत.

मरीया कोण होती Biblical teaching about Mary

मरीयेविषयी बायबल काही महत्त्वाच्या गोष्टी शिकवते. बायबलनुसार देवाने मरीयेला विशेष उद्देशासाठी निवडले होते, परंतु ती स्वतः देव नव्हती. तिची निवड देवाच्या तारणाच्या योजनेचा एक भाग होती. तसेच मरीयाने स्वतः देवाला आपला तारणारा म्हणून संबोधले आहे. ती म्हणते, “माझा आत्मा देव माझा तारणारा ह्याच्यामुळे आनंदित झाला आहे.” (लूक १:४७) यावरून स्पष्ट होते की तिलाही तारणाची गरज होती. याशिवाय मरीयाने स्वतःला प्रभूची दासी म्हणून स्वीकारले आणि देवाच्या इच्छेसमोर पूर्ण नम्रतेने स्वतःला समर्पित केले.

बायबल मरीया बाबत काय सांगते. What does the Bible say about Mary?

मरीया देवाची सेविका होती. तिने देवाच्या इच्छेस पूर्णपणे अधीन राहून विश्वासाचे उदाहरण घालून दिले. म्हणून ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनी तिच्या विश्वासाचे अनुकरण करावे. परंतु बायबल कुठेही तिची आराधना करण्याची आज्ञा देत नाही.

पवित्र शास्त्र स्पष्टपणे सांगते की आराधना केवळ देवाचीच करावी.

" परमेश्वर तुझा देव ह्याला नमन कर, व केवळ त्याचीच उपासना कर.." (मत्तय ४:१०)

देवाच्या गौरवासाठी राखून ठेवलेली आराधना कोणत्याही मानवाला, संताला किंवा देवदूताला देणे बायबलनुसार योग्य नाही. मरीया आदरास पात्र आहे कारण ती प्रभू येशूची जन्मदात्री होती, परंतु आदर आणि आराधना यामध्ये फरक आहे.

रोम १:२३, निर्गम २०:३-५

आराधना ही केवळ परमेश्वरासाठी आहे, तर आदर हा देवाच्या सेवकांना दिला जाऊ शकतो.

 मरीया मानवासाठी देवाकडे मध्यस्थी करू शकते काIs Mary the mediator between God and man?

मरीयेच्या मध्यस्थीबद्दल अनेक शिकवणी प्रचलित आहेत. परंतु मानव आणि देव यांच्यामधील बायबल मध्यस्थीविषयी स्पष्ट सांगते :

"कारण देव एकच आहे आणि देव व मनुष्य यांच्यामध्ये मध्यस्थही एकच आहे, तो म्हणजे मनुष्य ख्रिस्त येशू." (१ तीमथ्य २:५)

या वचनानुसार येशू ख्रिस्तच एकमेव मध्यस्थ आहे. त्याने आपल्या बलिदानाद्वारे मानवाला देवाजवळ येण्याचा मार्ग उपलब्ध करून दिला.

इब्री ७:२५ मध्ये देखील सांगितले आहे की येशू आपल्या लोकांसाठी सतत मध्यस्थी करतो. त्यामुळे विश्वासणाऱ्यांना देवाजवळ जाण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही मध्यस्थाची आवश्यकता नाही.

 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

१. मरीया मानव होती की देव?

बायबलनुसार मरीया ही एक सामान्य मानव होती. तिचा जन्म आई-वडिलांपासून झाला होता. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म पवित्र आत्म्याद्वारे झाला. त्यामुळे येशू हा केवळ मानव नसून देवाचा पुत्र आहे.

योहान १:१३, लूक १:३७

२. मानवाची आराधना करणे योग्य आहे का?

नाही. बायबल शिकवते की आराधना केवळ परमेश्वराचीच करावी. नाशवंत मानवाला देवाच्या स्थानावर बसवणे हे देवाच्या गौरवाला कमी करणारे आहे.

रोम १:२३

३. कृपा मरीयाकडून मिळू शकते का?

बायबलनुसार कृपा ही देवाकडून मिळते. मरीया स्वतः देवाच्या कृपेची प्राप्तकर्ती होती. कृपा आणि सत्य प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे जगात आले.

लूक १:२८, योहान १:१७

४. मरीया स्वर्गाची राणी आहे का?

बायबलमध्ये मरीयेला "स्वर्गाची राणी" म्हटल्याचा कोणताही उल्लेख नाही. उलट मरीया स्वतःला "प्रभूची दासी" म्हणते.   लूक १:३८

५. मरीयेला स्वर्गाची राणी कोणी घोषित केले?

पवित्र शास्त्रामध्ये असा कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे अशी शिकवण बायबलच्या बाहेरची आहे .

६. मरीया अगोदर की येशू अगोदर?

बायबलनुसार येशू ख्रिस्त हा सृष्टीपूर्वी अस्तित्वात होता. तो "आदि आणि अंत" आहे.

कलस्सै १:१५, प्रकटी १:१७

७. मरीयेला कोणी निर्माण केले?

बायबल शिकवते की सर्व सृष्टी येशू ख्रिस्ताद्वारे निर्माण झाली आहे. त्यामध्ये मरीयाचाही समावेश होतो.

योहान १:३, कलस्सै १:१६

८. मरीया येशूची आई होती का?

मानवी दृष्टिकोनातून मरीया येशूची जन्मदात्री होती. परंतु येशूचे दैवी अस्तित्व अनादी आहे. तो सर्व सृष्टीचा निर्माता आहे.

लूक १:३५, इफिस २:१०

९. मरीया मरण पावली का?

होय. सर्व मानवांप्रमाणे मरीयाही मरण पावली. परंतु बायबलमध्ये तिच्या पुनरुत्थानाचा उल्लेख नाही.

इब्री ९:२७

१०. मृत व्यक्ती मध्यस्थी करू शकते का?

बायबलनुसार जिवंत आणि पुनरुत्थित प्रभू येशूच आपल्या वतीने पित्याकडे मध्यस्थी करतो.

१ तीमथ्य २:५, रोम ८:३४, १ योहान २:१

११. मरीया शरीरासह स्वर्गात घेतली गेली का?

बायबलमध्ये मरीयाच्या स्वर्गारोहणाचा उल्लेख आढळत नाही. त्यामुळे अशा शिकवणींची सत्यता पवित्र शास्त्राच्या आधारे करणे आवश्यक आहे.

योहान १७:१७, १ करिंथकर ७:२३

१२. मरीयेची भक्ती करणे म्हणजे दुसऱ्या देवाची उपासना करणे आहे का?

होय, बायबलची पहिली आज्ञा सांगते की परमेश्वराशिवाय दुसरा देव नसावा. त्यामुळे आराधना केवळ परमेश्वरालाच करावी.

निर्गम २०:३, मत्तय ४:१०

१३. मरीया निष्कलंक आणि पापरहित होती का?

बायबलमध्ये मरीया निष्कलंक किंवा पापरहित असल्याचा स्पष्ट उल्लेख नाही. उलट ती स्वतः देवाला आपला तारणारा म्हणते.

यासाठी काही महत्त्वाची कारणे:

  • सर्व मानवांनी पाप केले आहे.
  • ख्रिस्त पापी लोकांचे तारण करण्यासाठी जगात आला.
  •  मरीयाने शुद्धीकरणाच्या नियमांनुसार अर्पण केले.
  • मानवाचा देह पापी स्वभावाचा असतो.

लूक १:४६-४७, रोम ३:२३, रोम ५:८, लूक २:२२-२७

 

निष्कर्ष

पवित्र शास्त्र आपल्याला शिकवते की आराधना, उपासना आणि तारण यांचा केंद्रबिंदू केवळ प्रभू येशू ख्रिस्त आहे. कोणत्याही मानवाला देवाच्या स्थानावर ठेवणे योग्य नाही. म्हणून प्रत्येक शिकवणीची परीक्षा बायबलच्या प्रकाशात करणे आवश्यक आहे.

"तुझे वचन सत्य आहे." (योहान १७:१७)

आपण देवाच्या वचनावर विश्वास ठेवूया, त्याचे पालन करूया आणि केवळ परमेश्वराचीच आराधना करूया.

 

 

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url